स्व.सुधाकरपंत परिचारक यांचा पुतळा उभारणीसाठी आ. परीचारकाकडे मागितली भीमा परिवाराने परवानगी!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

स्व.सुधाकरपंत परिचारक यांचा पुतळा उभारणीसाठी आ. परीचारकाकडे मागितली भीमा परिवाराने परवानगी!

 

सोलापूर // प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यावर, स्व. श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याची तयारी संचालक मंडळाकडून सुरू आहे. यासाठी परिचारक कुटुंबातील आ. प्रशांत परिचारक यांना परवानगी मागणीचे पत्र देण्यात आले आहे. या वृत्तामुळे पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील स्व. श्रीमंत परिचारक यांच्या समर्थकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्याची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दोनच दिवसापूर्वी पार पडली होती. या सभेत संबोधित करताना कारखान्याचे चेअरमन माजी खा. धनंजय महाडिक यांच्या संदर्भात व्यक्त केले होते. भीमा सहकारी साखर कारखान्यास वैभव प्राप्त करून देण्यासाठी स्व. सुधाकरपंत परिचारक यांचा मोठा वाटा असल्याचे वक्तव्य करून, कारखाना कार्यस्थळावर त्यांचा पुतळा उभा करण्याचा मानस व्यक्त केला होता. यासंदर्भात परिचारक कुटुंबाचे परवानगी घेण्यात येईल, असेही सांगितले होते. यानुसार कारखान्याचे संचालक तुषार चव्हाण यांनी नुकतीच आ. प्रशांत परिचारक यांची भेट घेतली, आणि भीमा कारखान्यावर स्वर्गीय श्रीमंत सुधाकर परिचारक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी परवानगी मागण्याचे पत्र देऊ केले.
आ. प्रशांत परिचारक यांनी यासंदर्भात कोणतीही प्रक्रिया दिली नसली तरी, पंढरपूर तालुक्यातील पांडुरंग आणि भीमा परिवारामध्ये या कृतीचे मोठे स्वागत होत आहे. कारखान्यास वैभव प्राप्त करून देणाऱ्या स्वर्गीय परिचारक यांचा पूर्णाकृती पुतळा कारखाना परिसरात उभारण्यात येत असल्याचा आनंद त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here