स्वेरी इंजिनिअरिंगच्या प्रा.स्वाती पवार यांना पीएच.डी. प्राप्त

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील प्रा.सौ.स्वाती प्रशांत पवार यांना डेव्हलपमेंट ऑफ डीप लर्नींग अल्गोरिदम फॉर अर्ली प्रेडीक्शन ऑफ लंग कॅन्सर्स’ या विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोधप्रबंध नांदेड मधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठच्या श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिटयुट ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सादर केला होता. पीएच.डी. प्राप्त केल्यामुळे आज महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.

         संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने व डॉ. संजय तलबार यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली प्रा.स्वाती पवार यांनी पीएच.डी. पूर्ण केली. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या लवकर तपासणीसाठी कॅन्सर तज्ञ सीटी स्कॅनचा वापर करतात. तथापीसीटी स्कॅनचे मॅन्युअल स्क्रीनिंग हे कष्टाचे आणि वेळखाऊ आहे. या प्रबंधामध्ये  फुफ्फुसाच्या कर्करोगाचा लवकर अंदाज लावण्यासाठी डीप लर्निंग या अल्गोरिदमवर आधारित निदान पद्धती विकसित करण्यासंदर्भात त्यांनी संशोधन केले आहे. पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते डॉ.स्वाती पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार. प्रा.व्ही.डी.जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. स्वाती पवार हया स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या १४ वर्षापासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. त्यांचे अनेक संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून प्रकाशित झालेले आहेत. पीएच.डी. प्राप्त केल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगेसंस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसलेइतर पदाधिकारी व विश्वस्तकॅम्पस इन्चार्जस्वेरी संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम.जी.मणियारडिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळडी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवेअभियांत्रिकीचे अधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापकशिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. स्वाती पवार यांचे अभिनंदन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here