स्वेरीत ‘फ्रंट एंड वेब डेव्हलपमेन्टस’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये बेसीक फ्रंट एंड वेब डेव्हलपमेन्टस’ या विषयावर दोन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सॉफ्टेक कंपनीचे संस्थापक स्वरित भंडारी यांनी मार्गदर्शन केले.

             स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली व इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने ही कार्यशाळा संपन्न झाली. दीपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांनी कार्यशाळेविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे सॉफ्टेक कंपनीचे संस्थापक स्वरित भंडारी बेसीक फ्रंट एंड वेब डेव्हलपमेन्टस’ संदर्भात बोलताना म्हणाले की, ‘अभियांत्रिकी मधील विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअरच्या संदर्भात शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नवनवीन उद्योग व्यवसायात नोकरीच्या संधी मिळू शकतात. ब्रँच कौन्सलर डॉ.व्ही.जी.काळे यांनी आय ट्रिपल ई अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग’ संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली. ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे म्हणाले की, ‘भविष्यात इलेक्ट्रॉनिक्सवर आधारील साधने अधिक वापरात येतील त्यामुळे येथून पुढे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग क्षेत्रात भविष्यात नोकरीच्या खूप संधी उपलब्ध होतील. कोरोना काळात देखील स्वेरीतून कंपन्यांमध्ये प्लेस होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान भक्कमपणे अवगत करावे.’ असे सांगितले. प्रा. विक्रम चव्हाण यांनी देखील विविध कार्यशाळांतून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रचंड माहिती मिळू शकतेयासाठी कोठेही कार्यशाळा असू द्या त्यात सहभागी होवून इलेक्ट्रॉनिक्स संदर्भात अधिकाधिक माहिती मिळवा.’ असे सांगून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नोकरीच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी विभागातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन आय ट्रिपल ई च्या सदस्या वैष्णवी देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार महेश देशमुख यांनी मानले.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here