स्वेरीतील एमएचटी- सीईटी क्रॅश कोर्स विद्यार्थ्यांच्या हिताचा-प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ एमएचटी-सीईटी २०२२ या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर स्वेरीत ‘क्रॅश कोर्स’चे उदघाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूर- ‘इंजिनिअरिंग प्रवेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी शासनाची  सीईटी परीक्षा देताना विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात आणि विद्यार्थी गोंधळून जातात.  एमएचटी-सीईटी २०२२ या परीक्षेसाठी  विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन व्हावे आणि ही  परीक्षा सुरळीत व सहज सोपी जावी, या हेतूने पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार स्वेरीत ‘क्रॅश कोर्स’ आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अधिकाधिक बौद्धिक विकास व्हावा यासाठी स्वेरीत सातत्याने विविध शैक्षणिक प्रयोग केले जातात. या उपक्रमांना  प्रचंड यश देखील मिळत आहे. हे पाहून मोठ-मोठ्या शहरातील विद्यार्थी देखील आता स्वेरीच्या शिक्षण संस्कृतीचा एक भाग बनत आहेत. स्वेरीने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील विद्यार्थ्यांना देखील सीईटी परीक्षेची तयारी होण्यासाठी cet.sveri.ac.in हे एक पोर्टल विकसित केले असून या पोर्टलमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या विषयांच्या अनेक प्रश्नावली दिल्या आहेत. विद्यार्थी ते प्रश्न ऑनलाईन सोडवू शकतात व विद्यार्थ्यांना उत्तरांची पडताळणी देखील करता येते. शासनाच्या मुख्य सीईटी परीक्षेपर्यंत या क्रॅश कोर्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सराव करता येणार आहे. तसेच तज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. या कोर्सचा विद्यार्थ्यांना  मुख्य सीईटी परीक्षेमध्ये अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी फायदा होणार आहे.’ असे प्रतिपादन स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी केले. 
           महाराष्ट्र राज्याच्या एमएचटी-सीईटी २०२२ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आज ‘क्रॅश कोर्स’ चे उदघाटन करण्यात आले. यावेळी डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. मिसाळ ऑनलाइन उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करत होते. प्रास्ताविकात प्रा. यशपाल खेडकर म्हणाले कि, ‘संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली  यशाकडे वाटचाल करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाचा प्रवास हा अदभूत आहे. उच्च निकालाची परंपरा, प्लेसमेंटच्या माध्यमातून मोठ मोठ्या कंपन्यात विद्यार्थ्यांची निवड, संशोधनाच्या विविध प्रयोगातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास सुयोग्य पद्धतीने होत आहे. एमएचटी- सीईटी परीक्षेबाबत सुयोग्य मार्गदर्शन करण्यासाठी या मोफत क्रॅश कोर्सची संकल्पना वस्तुस्थितीत आणली असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘स्वेरी’ मध्ये सीईटी ची मॉक टेस्ट देखील घेण्यात येणार आहे. एकूणच विद्यार्थ्यांच्या समृद्ध आणि प्रगतीसाठी स्वेरी अभियांत्रिकीचे शिक्षण हे प्रसिद्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या क्रॅश कोर्सचा भविष्यात फायदा होणार आहे.’  या क्रॅश कोर्स मधील गणिताचा पहिलाच तास प्रा. प्रसाद जरे यांनी घेतला. यामध्ये सीईटीच्या परीक्षेचे स्वरूप, गुण, प्रश्नांचे स्वरूप,  एकूण प्रश्न, मार्कांची विभागणी, परीक्षेच्या पेपरसाठी असणारा कालावधी  आदीबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.  यावेळी विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसंबंधी अनेक प्रकारचे प्रश्न विचारले असता प्रा. जरे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी या क्रॅश कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी टोल फ्री क्रमांक- ८९२९१००६१४ व प्रा. उत्तम अनुसे (मोबा.क्र. ९१६८६५५३६५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये सुरू केलेल्या क्रॅश कोर्स च्या उदघाटन प्रसंगी अभियांत्रिकीचे प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे यांच्यासह अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. 
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here