स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये इंडक्शन प्रोग्राम संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये इंडक्शन प्रोग्राम संपन्न!

गोपाळपूर (ता. पंढरपूर) श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ फार्मसी (पॉलीटेक्निक) यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मसी विभागाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी नुकताच एक दिवसीय इंडक्शन प्रोग्राम घेण्यात आला. या प्रोग्रामद्वारे विद्यार्थ्यांना फार्मसीबाबत समग्र माहिती मिळण्यास मदत झाली.

या कार्यक्रमासाठी एफ. डी. ए. महाराष्ट्रचे माजी सहाय्यक आयुक्त बी. इ. खोमणे व एम. ई. टी. कॉलेज ऑफ फार्मसी, बांद्रा, मुंबईचे डॉ. आनंद शेडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. दीपप्रज्वलनानंतर स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी इंडक्शन प्रोग्राम संदर्भात पार्श्वभूमी सांगितली तसेच जागतिक पातळीवर फार्मसी क्षेत्रात भारताचे महत्त्व विषद केले. प्रमुख अतिथी डॉ.आनंद शेडगे यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या विविध परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले. बी. इ. खोमणे हे ‘फार्मसीनंतरचे करिअर तसेच व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळवायचे असेल तर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे आणि त्याचबरोबर आत्मविश्वास असेल तर यशाची खात्री देता येते.’ अॅकडमीक इन्चार्ज डॉ. प्राजक्ता खुळे यांनी महाविद्यालयातील उपलब्ध साहित्य सामग्री, प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सुविधा आदी विषयी माहिती दिली. प्रा. सविता शिंपले व प्रा. मिसबा बाडेवाले यांनी फार्मसी संबंधित विविध परीक्षांच्या स्वरूपाबद्धल सखोल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी डॉ.मनोज नितळीकर, सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा.रितेश व्यवहारे व प्रा.वैभव गायकवाड तसेच स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी आणि स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी (पॉलिटेक्निक) चे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.अंबादास चिक्काळे यांनी केले तर स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पॉलीटेक्निक) चे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे यांनी आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here