स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये इंडक्शन प्रोग्राम संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी मधील प्रथम वर्ष डी.फार्मसी, बी.फार्मसी तसेच एम. फार्मसी मधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचाच एक भाग म्हणून एक दिवसीय ‘इंडक्शन प्रोग्राम’ घेण्यात आला.
         स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली या इंडक्शन प्रोग्रामचे उदघाटन थेमीस फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापक कुबेर तरकसबंद यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर प्रा. स्नेहा घुले यांनी प्रास्ताविकात एक दिवसीय इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. प्रा. प्रदीप जाधव यांनी बी. फार्मसीच्या स्थापनेपासुनची आत्तापर्यंतची वाटचाल सांगितली. प्रमुख पाहुणे कुबेर तरकसबंद हे  मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असे ज्ञान घेण्यासाठी, तसेच भविष्यात स्वतः साठी  नोकरीच्या विविध संधी निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे.’ यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना गिफ्टस् देऊन त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांनी ‘फार्मसी पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच्या उपलब्ध करिअरच्या संधी याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी करिअर विषयी प्रश्न विचारले असता प्रमुख पाहुणे तरकसबंद यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या प्रोग्राममध्ये फार्मसीचे १३० विद्यार्थी व सर्व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रा. कीर्ती महामुनी व प्रा. स्नेहा घुले यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.पुजा पाटील यांनी आभार मानले.  
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here