स्वेरीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये एक्सपर्ट सेशन संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर- स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग अँड आयडीएशन’ या विषयावर एक्सपर्ट सेशन संपन्न झाला.       

स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली  विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे विद्यापीठातील सायन्स आणि टेक्नॉलॉजी विभागाचे अधिष्ठाता श्री. अशोक सराफ हे या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक होते. प्रास्ताविकात डॉ. राजेश पाटील यांनी या सेशन मागील हेतू स्पष्ट केला. सेशनचे एक्स्पर्ट अशोक सराफ यांनी प्रॉब्लेम सॉल्विंग अँड आयडीएशन’ ची संकल्पना नेमकी काय आहेहे सांगून ‘ विद्यार्थ्यांनी एखादा प्रॉब्लेम सोडवताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा व कोणत्या स्टेप्स क्रमप्राप्त आहेत’ यावर सखोल मार्गदर्शन केले. या स्टेप्स आमलात आणताना कोणती काळजी घ्यावी व याच्या मदतीने आपण अंतिम ध्येयापर्यंत कसे पोहचावे यावर त्यांनी विचार स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनातील असणाऱ्या शंकांचे त्यांनी अतिशय सहजरीत्या निरसन केले.  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील जवळपास दीडशे विद्यार्थी या सेशनसाठी उपस्थित होते.  हा सेशन यशस्वी होण्याकरिता इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.अनिल टेकळे  यांनी केले तर प्रा.विजय सावंत यांनी आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here