स्वेरीचे माजी विद्यार्थी डॉ.प्रदीप जाधव यांना भारत शिक्षा गौरव पुरस्कार प्रदान संशोधनातील कार्याचा केला गौरव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रोडक्शन इंजिनिअरिंग या विद्याशाखेमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी प्रा. डॉ. प्रदीप विठ्ठल जाधव यांना नवी दिल्ली येथील के. टी. के. आउट स्टॅंडिंग अचिव्हर्स अँड एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी व संशोधन या दुहेरी कामगिरीमुळे भारत शिक्षा गौरव पुरस्कार २०२२’ हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

         स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी १९९८ साली ग्रामीण भागात उच्चतंत्र शिक्षणाचे द्वार खुले करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या आत्मविश्वासाने तंत्र शिक्षण घेवू लागले. अशातच प्रा. डॉ. प्रदीप विठ्ठल जाधव (रा. कुंभारगावजि.सांगली) यांनी २००२ मध्ये स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामधून शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी पीएच.डी. हा अभ्यासक्रम पूर्ण करून संशोधन क्षेत्रात पाऊल टाकले आणि अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत संशोधनात देखील मोठी मजल मारली. यामुळेच त्यांच्या कामगिरीने शिक्षण क्षेत्राने लक्ष वेधून घेतले. पुढे त्यांनी पुण्यात भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये काम पाहत संशोधन सुरूच ठेवले. त्यांनी संशोधनात मायक्रो मशिनिंगव्हायब्रेशनअॅग्री कल्चरल इ. क्षेत्रात संशोधन कार्य केले आहे. अध्यापन कार्य करता करता त्यांनी संशोधनातही प्रगती करून दाखवली. त्यामुळे न्यू दिल्ली येथील के.टी.के.आउट स्टॅंडिंग अचिव्हर्स अँड एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने भारत शिक्षा गौरव पुरस्कार २०२२ ’ हा पुरस्कार के.टी.के.आउट स्टॅंडिंग अचिव्हर्स अँड एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमन मेजर यशपाल सिंग यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. डॉ. जाधव यांना कुलगुरू डॉ.शिवाजीराव कदमडॉ. बी.एस.बिलगी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा.डॉ. प्रदीप जाधव यांना भारत शिक्षा गौरव पुरस्कार २०२२’ मिळाल्याबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारीस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here