स्वेरीचा ‘ग्लोबल इंडो सायंटीस्ट अँड टेक्नोक्रॅट फोरम’ सोबत सामंजस्य करार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचा भोपाळ येथे मुख्यालय असलेल्या ग्लोबल इंडो सायंटीस्ट अँड टेक्नोक्रॅट फोरम’ सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

      हा सामंजस्य करार शैक्षणिककृषीपौष्टिक आहारलाईफ सायन्सेस या विविध क्षेत्रांमध्ये समन्वयातून काम करण्यासंबंधी झालेला आहे. या करारातून समाजामध्ये पौष्टिक आहारपौष्टिक आहाराचे महत्वफळे आणि पालेभाज्यांमध्ये असणाऱ्या गुणधर्मांपासून होणाऱ्या फायद्यांबाबत समाजामध्ये जागृतता निर्माण करण्यासाठी मदत होणार आहे. या करारा अंतर्गत स्वेरी आणि ग्लोबल इंडो सायंटीस्ट अँड टेक्नोक्रॅट फोरम’ च्या माध्यमातून शैक्षणिककृषीपौष्टिक आहारलाईफ सायन्सेस या क्षेत्रांबाबत समाजामध्ये जागृतता करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यत्वे समाजासाठी आहार क्रांती आणि त्याला अनुसरून असलेल्या समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कराराद्वारे स्वेरीतील विद्यार्थी आणि संशोधक यांना ग्लोबल इंडो सायंटीस्ट अँड टेक्नोक्रॅट फोरम’ शी संबंधित असणाऱ्या विविध संस्थांमध्ये (शैक्षणिकसंशोधन आणि औदयोगिक) प्रशिक्षणाच्या संधी प्राप्त होणार आहेत. या सामंजस्य करारावर ग्लोबल इंडो सायंटीस्ट अँड टेक्नोक्रॅट फोरमचे आंतरराष्ट्रीय संयोजक डॉ. यल्लोजीराव मिरजकरनंदकुमार पालकरसमन्वयक डॉ. श्रीकांत कुलकर्णी व स्वेरीतर्फे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगेडॉ.एस.एस.वांगीकर आणि डॉ.आर.आर.गिड्डे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यापूर्वी स्वेरीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर ३२ कंपन्यांबरोबर सामंजस्य करार स्थापित झालेले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या हेतूने १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरवात झाली. तेथून पुढे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे एवढ्यावरच न थांबता त्यांचा कल संशोधनाकडे कसा वळविला जाईल हे पाहून त्या दृष्टीने संस्थेने पाऊले उचलली आहेत. आता स्वेरी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल यावर भर देत आहे. याच कारणामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी व परराज्यातील विद्यार्थी देखील स्वेरीकडे शिक्षणासाठी वळत आहेत. भारत सरकारच्या भाभा अणूसंशोधन केंद्रासह इतर अनेक संस्थाबरोबर झालेल्या करारामुळे आजमितीस संशोधनासाठी रु. नऊ कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला आहे. स्वेरीचे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट आणि विद्यापीठात सर्वोच्च निकाल मिळविण्याबरोबरच संशोधनाकडे वळत आहेतही सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रालादेखील गौरवाची बाब आहे. हा करार पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन अधिष्ठाता डॉ. आर.आर. गिड्डे यांनी परिश्रम घेतले. यावेळी संस्थेचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे हे देखील उपस्थित होते. या करारामुळे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्तस्वेरी कॅम्पसचे इनचार्जस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here