स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 12 ऑगस्ट रोजी सायक्लोथॉन व 14 ऑगस्ट रोजी मॅरेथॉन रॅलीचे आयोजन सायक्लोथॉन व मॅरेथॉन रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर,दि.10 (जिमाका) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम आयोजित होत आहेत. सायक्लोथॉन रॅली शुक्रवार दिनांक 12ऑगस्ट 2022 रोजी  सकाळी 6.00 वाजता सुरू होणार आहे. ह्या रॅलीची सुरूवात चार पुतळा चौक येथून होणार असून ही रॅली डफरीन चौक, रंगभवन, सातरस्ता, डीआरएम रेल्वे ऑफीस, एम्प्लॉयमेंट चौक यामार्गे चार पुतळा पर्यंत राहणार आहे.

     तसेच  मॅरेथॉन रॅलीचे आयोजन रविवार  दि.14 ऑगस्ट 2022 रोजी  सकाळी 6.15 वाजता हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथून सुरू होणार आहे. ही रॅली डफरीन चौक, कामत चौक, सात रस्ता, पत्रकार भवन मार्गे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे जवळ जाऊन तेथून यु टर्न घेऊन वापस त्याच मार्गे हरिभाई देवकरण प्रशाला येथे येणार आहे. सोलापुर रनर्स असोसिएशनच्या सहकार्याने मॅरेथॉन होणार असून यामध्ये सहभागी होणाऱ्याना प्रमाणपत्रही असोशियन मार्फत देण्यात येतील, अशी माहिती असोसिएशनचे सचिव डॉ. विश्वास बिराजदार यांनी दिली आहे.

        तरी या रॅलीमध्ये शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व शहरातील नागरिक तसेच मान्यवरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here