स्वराज्य महोत्सवांतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवावी  – जिल्हाधिकारी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जिल्ह्यातील सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी समूह राष्ट्रगान मध्ये सहभाग घ्यावा.

सोलापूर, दि.5(जिमाका):- जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव हा उपक्रम राबविला जात आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी दिनांक 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सवानिमित्त आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

           स्वराज्य महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात स्वच्छता राहील याबाबत विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी. तसेच सर्व विभागप्रमुखांनी आजादी का अमृत महोत्सव आकाम(AKAM) लोगो शासकीय इमारतीवर लावावा. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय,शैक्षणिक संस्था व विद्यापीठ यामधून दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायन होईल. यामध्ये सर्व नागरिक, शासकीय/निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here