सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाचे विचार, कार्य जनतेपर्यंत पोहोचवा :- अभिजीत अंकलकोटे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाचे विचार, कार्य जनतेपर्यंत पोहोचवा :- अभिजीत अंकलकोटे

सोलापूर शहर व जिल्हा युवक कॉंग्रेस सोशल मीडिया पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती संपन्न.

सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सेलच्या राज्य पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, सोलापूर जिल्हा, तालुका, सोलापूर शहर, सर्व विधानसभा पातळीवरील कॉंग्रेस सोशल मीडिया पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सोशल मीडिया सेल प्रदेश प्रतिनिधी अभिजित अंकलकोटे, पिंपरी चिंचवड युवक कॉंग्रेस सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, विश्वजित जाधव, यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस व नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस सुमीत भोसले, सोलापूर शहर जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, दाऊद नदाफ आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सोशल मीडिया कार्यकर्त्यांसमोर बोलताना प्रदेश प्रतिनिधी अभिजित अंकलकोटे म्हणाले की, सोशल मीडिया हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम आहे. एका क्षणात हव्या त्या ठिकाणी, संभाव्य लोकांपर्यंत पोहचण्याचे महत्वाचे साधन म्हणून फेसबुक, व्हॉट्सप, ट्विटर, इन्स्ट्राग्राम, आदींचा वापर होत आहे. लोकसभेचे दोन व इतर अनेक निवडणुका विरोधी पक्षांनी सोशल मीडियाचा वापर करून निवडून आले. कॉंग्रेस पक्षाने याचा गंभीरपणे विचार करून युवक काँग्रेसची सोशल मीडिया संघटना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या सूचनेनुसार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्ह्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती घेऊन सोशल मीडियाची संघटन बांधणी करत आहोत. सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांना पक्षात योग्य तो सन्मान देण्यात येईल. काँग्रेसचा सोशल मीडिया कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून आपण सर्व जण सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाचे कार्य, धोरण, विचार, आदरणीय सोनियाजी गांधी, मा. राहुलजी गांधी, मा. सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणिती शिंदे व सर्व नेतेमंडळीचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्षाचे हात बळकट करावे. स्वतःची ओळख निर्माण करावे, असा संदेश दिला. आज झालेल्या मुलाखती कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून लवकरच नियुक्त्या करण्यात येतील.
या शुभम यक्कलदेवी, शशिकांत शेळके, शुभम शिराळ, रोहित पाटील, अजिंक्य पाटील, मुरलीधर काळे, किरण शिंगाडे, शिवराज कोरे, जिशान मुजावर, सचिन खैरे, यांच्यासह इतर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here