सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने जीवघेण्या महागाईच्या विरोधात स्वाक्षरी मोहिम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने जीवघेण्या महागाईच्या विरोधात स्वाक्षरी मोहिम

सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने गॅस, पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात नवीपेठ येथे स्वाक्षरी मोहिमचा प्रारंभ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. ही स्वाक्षरी मोहिम दिनांक १३ ते १५ जुलै २०२१ या कालावधीत शहरातील विविध भागातून, चौकाचौकातून राबविण्यात येणार असल्याचे महिला अध्यक्षा हेमाताईं चिंचोळकर यांनी सांगितले.

गॅस,पेट्रोल, डिझेल च्या गगनाला भिडलेल्या किंमती, जीवनावश्यक वस्तुंची दरवाढ या सर्वांवर केंद्रातील मोदी सरकारचे नसलेले नियंत्रण, या मुळे जनतेमध्ये व महिला वर्गात प्रचंड नाराजी असून गृहिणींचा जीव मेटाकुटीस आला आहे.

त्यामुळे इंधनाची व जीवनावश्यक वस्तुंची दरवाढ कमी झालीच पाहिजे यासाठी ही राज्यव्यापी स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे असे प्रतिपादन कु हेमा चिंचोळकर यांनी केले.

या स्वाक्षरी मोहिमेस नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी माजी महापौर अलकाताई राठोड, म.प्र.महिला काॅ.च्या सचिवा सुमन जाधव, उपाध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, विणा देवकते, रतन डोळसे, निता बनसोडे, मुस्कान शेख, बसंती साळुंके, मुनेराबी शेख, मीना गायकवाड, अनिता भालेराव, सुरेखा घाडगे आदि महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here