सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने बाॅर्डरवर देशाचे रक्षण करणा-या सैनिकांना रक्षाबंधना निमित्त राख्या रवाना.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने बाॅर्डरवर देशाचे रक्षण करणा-या सैनिकांना रक्षाबंधना निमित्त राख्या रवाना.

सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने देशाच्या पंच्याहत्तर व्या अमृतमहोत्सवानिमित्त व्यर्थ न हो बलिदान अंतर्गत शहर मध्यच्या आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष कु. प्रणितीताई यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांच्या *नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार नगरसेवक विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधना निमित्त बाॅर्डरवर देशाचे रक्षण करणा-या सैनिकांना राख्या पाठविण्यात आल्या.

आपले घरदार आपल्या कुटुंबापासून दूर राहून बाॅर्डरवर राहून देशाचे किंबहूना आपल्या सर्वांचे रक्षण करणारे जवान सैनिक लढतात त्यामुळे आपण आपला देश सुरक्षित आहे. रक्षण करणा-या सैनिक भावा बहिणीचे नाते अतूट व घट्ट होण्यासाठी आज आम्ही महिला काँग्रेसच्या भगीनी ह्या राख्या पाठवून आमच्या भावना त्यांच्यापर्यत पोहचवत आहोत असे उद्गार सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांनी काढले

यावेळी माजी महापौर , नलिनी चंदेले, म.प्र.महिला काॅ.सचिवा सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोबे, रतन डोळसे, नंदा कांगरे, संतोषी गुंडे,अंजली मंगोडेकर, बसंती साळुंके, मुमताज तांबोळी, सुरेखा घाडगे, जगदेवी कदम,मुनेराबी शेख, वैशाली गौड, तिरुपती परकीपंडला,ब्लाॅक अध्यक्षा देवा गायकवाड, अंबादास गुंत्तीकोंड, सोपान थोरात, हाजिमलम नदाफ, सुनिल व्हटकर, लक्ष्मीनारायण दासरी, बसवराज म्हेत्रे, राहुल बोळकोटे, मारुती शेख, व्ही.डी.गायकवाड, गोविंद कांबळे, सिद्राम अट्टेललु, आदि पदाधिकारी सह कार्यकत्या उपस्थित होत्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here