सोलापूर शहर कॉंग्रेस च्या वतीने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी “कॉंग्रेस आपल्या दारी” अभियानाचा उद्यापासून सुरुवात
सोलापूर // प्रतिनिधी
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली, जेष्ठ नेतेमंडळी, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, ब्लॉक फ्रंटल पदाधिकारी, शहर काँग्रेसच्या पदाधिकारयांचा प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर कॉंग्रेस च्या वतीने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी “कॉंग्रेस आपल्या दारी” या अभियानाची सुरुवात उद्या दिनांक 26 जुलै 2021 पासून प्रभाग क्रमांक 8 उत्तर कसबा, कसबा गणपती जवळ येथून सायंकाळी 5:30 वाजता करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते प्रविण वाले यांचे काँग्रेसचे वार्डातील कार्यालयाचे उद्द्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या “कॉंग्रेस आपल्या दारी” अभियानाच्या माध्यमातून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शहरातील प्रत्येक वार्डात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करतील, सर्व वार्डात शाखा उद्द्घाटन, कॉंग्रेस कार्यालय उद्द्घाटन, शाखा नामफलकाचे शुभारंभ, करण्यात येणार असून तसेच कॉंग्रेस पक्षाचे वार्डातील कार्यालय म्हणजे नागरिकांसाठी एक हक्काचे ठिकाण होईल ज्या ठिकाणी येऊन ते आपल्या समस्या सांगतील. कॉंग्रेस पक्षाचे कार्य, तसेच महाविकास आघाडीच्या योजना, कॉंग्रेस पक्षाचे धोरण, विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.