सोलापूर शहर काँग्रेस पक्ष समन्वय समितीची पुनर्रचना करण्यात यावे – माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे यांची मागणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर शहर काँग्रेस पक्ष समन्वय समितीची पुनर्रचना करण्यात यावे – माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे यांची मागणी

सोलापूर – आगामी सोलापूर महानगरपालिका 2022 मध्ये होणाऱ्या निवडणूक निमित्ताने सोलापूर शहर काँग्रेस पक्षाची समन्वय समिती पुनर्रचना होणे गरजेचे आहे. सोलापूर शहरामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत.

प्रत्येक वर्गामध्ये पक्षबांधणी सुरू आहे या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक वार्डात समन्वय समितीच्या माध्यमातून काम करणे गरजेचे आहे. शहरात आज महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे फक्त 14 नगरसेवक आहेत अनेक वर्षे माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची सत्ता होती मोदी लाटेमध्ये व खोटी आश्वासने दिल्यामुळे मनपात काँग्रेसची सत्ता गेली. पाच वर्षात भाजप सत्ताधारी पक्ष म्हणून कुठल्याही ठोस कामे सोलापूर शहराच्या विकासासाठी केले नाही. भाजपच्या दोन आमदारांमध्ये भांडणे होऊन शहराचा विकास झाला नाही. नगरसेवक व महापौर सभागृहनेता यांच्यात समन्वय नसल्यामुळे काहीच काम झाले नाही. बोर्ड व्यवस्थित चालवता आले नाही. उजनी धरण 100% पाणी असताना देखील पाण्याचे नियोजन करते आले नाही. शहरातील नागरिकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत योजनेच्या माध्यमातून शहरातील कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे यामुळे काही लोकांचे प्राण गेले आहेत कोरोनाच्या कालखंडात योग्य नियोजन केले नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये शहराच्या विकासासाठी कुठलेही नियोजन केले नाही. राज्यात भाजपची सत्ता असताना मोठ्या प्रमाणात निधी आणू शकले नाहीत. त्यामुळे आगामी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी काँग्रेस पक्षाची समन्वय समिती मजबूत करणे गरजेचे आहे.

गेल्या अनेक वर्षापासून तेच नेते समन्वय समितीमध्ये आहेत काही काँग्रेस पक्ष सोडून गेले आहेत काँग्रेस पक्ष समन्वय समितीमध्ये काही जुने व काही नवीन निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी यांना घेऊन नवचैतन्य निर्माण करून काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी समन्वय समितीचे पुर्नरचना करावी असे निवेदन माजी केंद्रीय गृहमंत्री मा.सुशीलकुमार शिंदे साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नाना पाटोळे व मा.आमदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा प्रणितीताई शिंदे, सभागृह नेते व सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी ई-मेल द्वारे निवेदन दिले. तसेच सोलापूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले यांना आज रोजी कॉंग्रेस भवन सोलापूर येथे निवेदन दिले.

यावेळी शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, गटनेते चेतन नरोटे, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, जेष्ठ नेते किसन मेकाले गुरुजी, युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष भारत जाधव, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, दिनेश म्हेत्रे, सोपान थोरात, दत्ता नामकर, शिकलगार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here