सोलापूर विधान परिषदेसाठी आमदार प्रशांत परिचारक हेच भाजप कडून प्रबळ दावेदार?

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर विधान परिषदेसाठी आमदार प्रशांत परिचारक हेच भाजप कडून प्रबळ दावेदार?

 

सोलापूर // प्रतिनिधी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत चालला असून महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, व विधान परिषदा यांच्या निवडणुकीचा बिगुल वाढण्याची येत्या दोन महिन्यात दाट शक्यता असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा पाच ते सहा सहकारी साखर कारखान्यांच्या सुविधा निवडणुका होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून येत्या महिन्याभरात याबाबतचा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये मागील 2015/16साली सोलापूर जिल्हा विधान परिषद सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आ. प्रशांत परिचारक यांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये सध्या संपूर्ण भारतीय जनता पार्टी मधून सोलापूर जिल्ह्यातून एकमेव उमेदवार म्हणून आमदार परिचारक यांच्याकडे पाहिले जात असून कशा पद्धतीचे सहा वर्षात त्यांचे चांगल्या पद्धतीचे काम राहिले आहे काही अपवाद वगळता आमदार परिचारक यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात साठी 2016 ते 2020 या कालावधीमध्ये महायुतीचे सरकार असताना भारतीय जनता पक्षाकडून केंद्रातून व राज्यातून मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातली निधी आणला आहे यामध्ये प्रामुख्याने त्यांनी पंढरपूर शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला असून पंढरपूर/ मंगळवेढा तालुक्यातील अनेक पाणलोट जलसिंचन व शिरनांदगी तलावासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करून सर्व पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील जनतेला न्याय दिला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही त्यांनी मागच्या महायुतीच्या सरकारमधून व सध्याच्या महा विकास आघाडीचे सरकारमधून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून मोठ्या प्रमाणात कामे पूर्णत्वास नेले आहेत यामध्ये प्रामुख्याने त्यांनी कोरोना महामारी या काळामध्ये सातत्याने सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापूर जिल्ह्याला झुकते माप दिले आहे. आमदार परिचारक यांच्या काम करण्याची पद्धत वेगळी असून जनमानसामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ठसा त्यांनी आजपर्यंत आपल्या काम मधून उमटविला आहे. परिचारक हे जरी भारतीय जनता पार्टी सोबत असली तरी त्यांनी सर्व पक्षांची सलगी ठेवली आहे. 2020 साली कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या दुःखद निधनानंतर त्याने स्वतःला सावरून एक चांगल्या प्रकारचे काम संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात करून दाखवले असून भाजपाकडून सोलापूर जिल्हा विधान परिषदेसाठी ते प्रबळ दावेदार असल्याचे सुतोवाच भारतीय जनता पार्टीच्या एका माजी मंत्र्यांनी केल्याचे समजते आहे. 2019 सालच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी स्व:ता उमेदवारी न घेता मंगळ वेड्याचे उद्योगपती समाधान आवताडे यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्‍याने निवडून अन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली!
भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील व केंद्रातील सर्व नेत्यांना त्यांनी याद्वारे दाखवून दिले की “हम भी किसीसे कम नही” व राज्यातील सर्व भाजपच्या नेत्यांची मने जिंकली.

भारतीय जनता पार्टी कडून द प्रशांत परिचारक यांना पुनश्च एकदा विधान परिषदेची उमेदवारी मिळाली तर ते पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करू शकतील का? व आगामी निवडणुकीमध्ये महा विकास आघाडी सरकार कडून उमेदवारी कोण पुढे येतो व त्याची टक्कर माझ्याबरोबर होईल ते गृहीत धरून त्यांनी आत्तापासूनच गुप्तपणे व्युहरचना आखायला सुरुवात केली असून आगामी येत्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अजून बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून मागच्या वेळचा पराभूत उमेदवार पुन्हा एकदा न देण्याची सर्वात मोठी जबाबदारी राष्ट्रवादी या जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी आता येऊन ठेपली असून आमदार प्रशांत परिचारक यांचा विजयाचा वारू रोखणार का? असा प्रश्न संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील माणसातून सध्यातरी चर्चिला जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here