सोलापूर म्हापालिकेवर तिरंगा फडकाविण्याच्या काँग्रेसचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांचा निर्धार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर म्हापालिकेवर तिरंगा फडकाविण्याच्या काँग्रेसचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांचा निर्धार

 

आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारी संदर्भात सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी ब्लॉक, फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, विशेष उपस्थिती जेष्ठ नेते सुधीर खरटमल, गटनेते चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, माजी महापौर U.N. बेरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल लोटस येथे संपन्न झाली.
या बैठकीस जेष्ठ नगरसेवक शिवा बाटलीवाला, रियाज हुंडेकरी, नरसिंग कोळी, विनोद भोसले, तौफिक हत्तुरे, प्रवीण निकाळजे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका परवीन इनामदार, फिरदोस पटेल, वैष्णवीताई करगुळे, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, उदयशंकर चाकोते, सरचिटणीस मनीष गडदे, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, भटक्या विमुक्त विभाग अध्यक्ष भारत जाधव, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, उदयोग वाणिज्य सेलचे पशुपती माशाळ, भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड, कामगार सेलचे सायमन गट्टू, श्रद्धा आबुटे, प्रियांका डोंगरे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल म्हणाले की, मी सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसचा सच्चा चाहता आहे आणि सच्चा चाहता दुसरीकडे कुठेही जात नाही मी नेहमी कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतो त्यांचा कार्यक्रमालाही जात असतो मी कार्यकर्त्याला कधीही दूर जाऊ दिले नाही. कार्यकर्त्यांमुळे पक्षाची ताकद वाढते. नेत्यांनीही कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. मला कुठल्याही राजकीय पदाची हौस नाही शिंदे साहेबांचा चाहता म्हणून आमदार प्रणितीताई जे सांगतील ती जबाबदारी मी फार पाडायला तयार आहे. मी संघटना बळकटीसाठी काम करायला तयार आहे सध्या सोलापूर महापालिकेत भाजपचा भोंगळ कारभार चालू आहे ते लोकांना पाणी देऊ शकत नाही. जिथे जिथे गरज आहे तिथे मदत करायला तयार आहे म्हणून येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करून महापालिकेवर तिरंगा फडकविणार असल्याचे सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here