सोलापूर महापालिकेची अवस्था आर्थिक अतिशय बिकट, डिझेल नाही म्हणून जेसीबी, घंटा गाड्या बंद व इतर वाहने बंद, गरीब महापालिकेला सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे पालिकेला पाच लिटर डिझेलचे 478/- रुपयाचे धनादेश दिले

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर महापालिकेची अवस्था आर्थिक अतिशय बिकट, डिझेल नाही म्हणून जेसीबी, घंटा गाड्या बंद व इतर वाहने बंद, गरीब महापालिकेला सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे पालिकेला पाच लिटर डिझेलचे 478/- रुपयाचे धनादेश दिले

 

महापालिकेची अवस्था अतिशय बिकट, डिझेल नाही म्हणून जेसीबी, घंटा गाड्या बंद व इतर वाहने बंद आहेत त्यामुळे गरीब महापालिकेला उपरोधीकपणे सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे पालिकेला पाच लिटर डिझेलचे 478/- रुपयाचे धनादेश अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे साहेब यांना देण्यात आले.

यावेळी बोलताना शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे म्हणाले की, भाजपच्या खोट्या आश्वासनाला भुलून सोलापुरी जनतेने मोठया अपेक्षेने महापालिकेची सत्ता भाजपच्या हातात दिली. पण सोलापूर महापालिकेत आज रोजी डिझेल नसल्यामुळे जेसीबी, घंटा गाड्या व इतर नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी वापरण्यात येणारे वाहने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे प्रभागातील घंटा गाड्या, जेसीबी मुळे होणारे कामे, बंद पडले आहेत यामुळे सर्वत्र कचरा, पावसाळी पाण्याचा निचरा, नाले सफाई आदी कामे थांबणार आहेत त्यामुळे रोगराई पसरणार आहे. नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. गेल्या चार वर्षात सत्ताधारी भाजपवाल्यांनी आपल्या गतातटाच्या भांडणात महापालिकेची वाट लावली, आर्थिक शिस्त नाही, प्रशासनावर अंकुश नाही, नगरसेवकांना विकास निधी नाही, कामगारांचे पगारी होत नाहीत, महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करताना दिसून येत नाहीत म्हणून सोलापूर महापालिकेची आर्थिक अवस्था अतिशय बिकट झाली असून आज डिझेल नसल्यामुळे वाहने बंद पडली आहेत म्हणून आज रोजी भाजप पदाधिकाऱ्यांना झोपेतून जागे करण्यासाठी उपरोधीकपणे गरीब झालेल्या सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे साहेब यांना पाच लिटर डिझेलचे 478/- रुपयांचा धनादेश देण्यात मदत म्हणून आला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here