सोलापूर पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडविणार :- विष्णु कारमपुरी (महाराज)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडविणार :- विष्णु कारमपुरी (महाराज)

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या माध्यमातुन पत्रकारांच्या समस्या बरोबर सामाजिक समस्यांही सोडविण्याचा प्रयत्न करणार . असा निर्धार सोलापूर वृत्तपत्र पत्रकारसंघाच्या बैठकीत करण्यात आल्याचे माहिती सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकारद्वारे दिली आहे .
सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाचे मासिक बैठक दि . ८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता संघटनेच्या कार्यालयात घेण्यात आली . बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी विष्णु कारमपुरी (महाराज) हे होते. प्रारंभी उपस्थिती सभासदांचे स्वागत मुस्ताक शेख यांनी केले . त्यानंतर सभाअध्यक्ष यांनी बैठकीतील विषयांचे वाचन केले . त्यात *१) मागील सभेची वृत्तांत वाचून मंजूर करणे . २) संघटनेचे कामकाज पुर्वरत सुरु करणे बाबत आणि ३) मा.अध्यक्ष यांच्या परवानगीने येणारे आयते वेळेचे विषय, पहिला विषय एकमताने मंजुर करण्यात आले.* विषय दोन संघटनेच्या पुर्नबांधणी जोमाने सुरु करणे बाबत सर्व सभासदांनी आपापल्या परिने प्रयत्न करावे. असे आवाहन केले . त्यावर सर्व सभासदांनी वेग वेगळ्या माध्यमातून संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला . त्यानंतर आयत्या वेळेच्या विषयात सन्मानिय सदस्य आजी जे.एम. सिकलगर यांनी आपल्या पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या समस्या सोडविण्या बरोबर समाजातील विविध सामाजिक समस्याही सोडविण्याचे प्राधान्य द्यावे . असे सुचना केले . त्यावरून समाजातील सामाजिक समस्या व अडचणी सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा करून एकमताने समाजातील उपेक्षित वर्गाच्या सर्व समस्या सोडविण्याचा ठरले . त्याच बरोबर सध्या केंद्र शासनाचे प्रसिध्दी माध्यमांची देय धोरणे अत्यंत घातक असून प्रसिध्दी माध्यमांना संपविण्याचा विडा केंद्र शासनाने उचलला आहे . त्यामुळे याबाबत आपल्या संघटनेच्या वतीने केंद्र शासना विरूध्द अखंडीत लढा उभा करण्याचा एकमताने ठरविण्यात आले .
शेवटी सभा अध्यक्ष विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी इतर समस्या बरोबर संघटना सभासद वाढविण्यास प्रयत्न करावे , असे आवाहन करून सर्वांची आभार माणून बैठक संपल्याचे जाहीर केले .
विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुस्ताक शेख , वामन निंबाळकर , ज.एम. सिकलगर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here