सोलापूर जिल्ह्यात Solapur दुष्काळ जाहीर करून फळबागांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये अनुदान घोषित करावे -प्रा.संग्रामदादा चव्हाण Sangram chvhan

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्ह्यात Solapur दुष्काळ जाहीर करून फळबागांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये अनुदान घोषित करावे
-प्रा.संग्रामदादा चव्हाण Sangram chvhan

solapur जिल्ह्यातील तापमान 45 °c पर्यंत पोहोचल्यामुळे भूजल पातळी खालावली असून ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी Farmers तर सोडाच पण water पिण्यासाठी पाणी उरले नसून जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती तयार झाली आहे. जिल्ह्यातील सर्व विहिरी व बोरवेल्स आटल्या असून पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी त्यांच्या द्राक्ष,डाळिंब सिताफळ,पेरू, केळी,पपई यासारख्या लाखो रुपये गुंतवून उभ्या केलेल्या फळबागा वाचवण्यासाठी बोअरवेल वर खर्च करत आहेत.मात्र बोरवेलला पाणी न लागल्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे.काही शेतकऱ्यांच्या कडे शेततळी आहेत पण शेततळ्यामधले पाणी बाष्पीभवनाने जलद गतीने कमी झाले आहे.भीमा नदीकाठी पाणी उपसा करण्यासाठी बंदी आहे.काही शेतकरी फळबागांना टँकरने पाणी देऊन फळबागा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेती ही उजनी धरणावर अवलंबून असून ज्या वर्षी धरण 100% भरत नाही त्या प्रत्येक वर्षी शेती उध्वस्त होत आहे. कधी दुष्काळ,कधी अतिवृष्टी,कधी वादळ तर कधी गारपीट या नैसर्गिक संकटांमुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी हवालदिल झाले आहेत.यावर्षी उजनी धरण 60% टक्के एवढेच भरले होते. त्यामुळे शेतीसाठी एकच आवर्तन देण्यात आले. शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पिके घेता आली नाहीत.आज जिल्ह्यातील भूजल पातळी एकदम खालावली असून शेतीसाठी तर सोडाच परंतु पिण्यासाठी सुद्धा पाणी ऊरलेले नाही. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबागा वाचविण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर येऊन ठेपले आहे. प्रचंड भांडवली गुंतवणूक करून मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या फळबागा वाचवणे गरजेचे असून राज्य सरकारने फळबाग शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये एवढे अनुदान युद्ध पातळीवर जाहीर करावे अशी मागणी सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
प्रा. संग्राम चव्हाण यांनी Sangram Chavhan निवेदनाद्वारे केली.

सोलापूर शहरा साठीच्या समांतर जलवाहिनीचे काम जलद गतीने पूर्ण करावे.

सोलापूर शहरासाठी पिण्याचे पाणी म्हणून एका वेळी 6 टीएमसी एवढे पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात येते. धरण ते औज बंधारा हे अंतर दोन अडीचशे किलोमीटर एवढे असून नदी पात्रातील वाळू उपसा मुळे झालेले खड्डे तसेच वाढते तापमान यामुळे हे पाणी पोहोचण्यास विलंब तर होतोच पण यातील बरेचसे पाणी वाया जाते. जर समांतर जलवाहिनीचे काम त्वरित पूर्ण झाले तर वरील 6 टीएमसी पाण्यामध्ये शेतीची तीन आवर्तने पूर्ण करता येतील व धरण दरवर्षी जरी 100% भरू शकले नाही तरी उन्हाळ्यामध्ये सदरच्या बचत झालेल्या पाण्याचे शेतीसाठी आवर्तनाचे नियोजन करून जिल्ह्यातील शेती उध्वस्त होण्यापासून वाचवता येईल.
प्रा.संग्रामदादा चव्हाण,
*जिल्हाध्यक्ष, सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here