सोलापूर अन्न व औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड:-सुनील ओहोळ (वेळापूर परिसरातील दूध संकलन केंद्रावर जाऊन चुकीच्या पद्धतीने नमुने घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी) (कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुकारण्यात येईल:- सुनील ओहोळ)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर अन्न व औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड:-सुनील ओहोळ

(वेळापूर परिसरातील दूध संकलन केंद्रावर जाऊन चुकीच्या पद्धतीने नमुने घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी)

(कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुकारण्यात येईल:- सुनील ओहोळ)

वरील विषयास अनुसरून सोलापूर अन्न व औषध प्रशसनाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा दूध व्यवसाय अधिकारी यांच्या पथकांनी दिनांक २५/०४/२०२४ रोजी १) डेली विश दूध संकलन केंद्र,२) नेचर दूध संकलन केंद्र,३) गायत्री दूध संकलन केंद्र, ४) डेली विश दूध संकलन केंद्र २५/४ येथे जाऊन दुधाचे नमुने घेतले आहेत हे अशा पद्धतीने नमुने घेणे आम्हाला मान्य नाही, या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळेस दूध टँकर वेळापूरच्या बाहेर पडल्यानंतर टँकर थांबवून दूध नमुने घेणे महत्त्वाचे आहे. परंतु सोलापूर अन्न व औषध प्रशासन विभाग व दुग्धविकास अधिकारी सोलापूर या अधिकाऱ्याने तसे केले नाही. आपण स्वतंत्र टीम पाठवून टँकर थांबवून नमुने घ्यावेत, ही विनंती.
सोलापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन व दुग्धविकास प्रशासन सर्व अधिकाऱ्यांची या प्रकरणात चौकशी करावी अन्यथा बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन केले जाईल.

चौकट

सोलापूर जिल्ह्यातील विशेषता माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील महिन्याकाठी मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या चार दूध संकलन केंद्राबाबत तक्रार प्राप्त झाली होती त्याबाबत आम्ही सोलापूर अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना वारंवार त्याबाबत माहिती दिली होती पण अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या दूध संकलन केंद्रावर जाऊन चुकीच्या पद्धतीने त्या दुधाचे नमुने घेतले असून जर सोलापूर अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र टीम पाठवून टॅंकर थांबून नमुने घेतले नाही तर तीव्र असे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येईल.

सुनील ओहोळ
राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन सत्यशोधक संघ.मुंबई

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here