सोलापूरात कॉंग्रेसचा विजय संकल्प मेळावा;नाना पटोलेंच्या झंझावाती दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(आ.प्रणितीताई शिंदे यांना मंत्रिपद मिळण्यासाठी नानाभाऊंना कार्यकर्त्यांनी घातले साकडे)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

कोणत्या पक्षाने काय घोषणा करायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. कोणाला पक्ष सोडायचा त्यांना सोडू दे. ज्याला स्वेच्छेने काम करायचे आहे. त्यानी काँग्रेस मध्ये काम करावे आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचाच महापौर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

सोलापुरातील मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना म्हणाले, आज महाआघाडीच्या नेतृत्वाच्या मागे बेकायदेशीरपणे ईडी, सीबीआय चौकशी लावली जात आहे. तर दुसरीकडे फोन टॅपिंग प्रकरणात नुसत्या चौकशीला बोलावले तर देवेंद्र फडणवीस कांगावा करत आहेत. त्यांची ही नोटंकी आहेत. आज विरोधकांच्या गोष्टीला कोणीही सिरीवस घेत नाहीत. राज्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात जनतेला आता रस नाही.

आम्ही केवळ विकासाचे राजकारण करतो त्यामुळे कोणी पेनड्राईव्ह काढो अथवा कोणाच्या मागे ईडी लावो आम्हाला काही फरक पडत नाही. पेनड्राईव्ह प्रकरणात ग्रहमंत्री आपली बाजू मांडत आहेत, त्यानंतर सत्य बाहेर पडेल असेही पटोले म्हणाले राजकारणात आता भाजपने ब्लॅकमेलिंग आणली आहे. आमचे कर्नाटक आणि मध्य प्रदेशाचे सरकार पडले, महाराष्ट्रातही तसाच प्रकार सुरू आहे मात्र येथे त्यांना यश मिळणार नाही आमचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे महागडी सरकारमध्ये कोणते ही अस्वस्थता नाही. काही अडचणी आहेत, क्या आम्ही सोडवू. तीन पक्षाचे सरकार असल्याने काही समज गैरसमज होतात. मात्र जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही एकत्र असतो, असेही ते म्हणाले.

पाच राज्यातील पराभवानंतर कोणीही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, गांधी घराण्याचे कार्यकर्त्यांना, पक्षाला गरज आहे, असेही ते म्हणाले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here