सोलापूरच्या सिद्धेश्वर बँकेची अखेर निवडणूक लागली! (10 जागेसाठी 4 डिसेंबर रोजी होणार मतदान)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर येथील सिध्देश्वर सहकारी बँकेची अखेर निवडणूक लागली. या निवडणुकीसाठी येत्या 4 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी 15 पैकी 4 जागा बिनविरोध झाल्या होत्या. इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारणच्या 10 जागेसाठी 27 उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते. अर्ज माघारीसाठी 23 नोव्हेंबरपर्यंत शेवटची मुदत होती.

बुधवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी 27 पैकी 15 अर्ज माघार घेण्यात आले त्यात इतर मागासवर्ग ही जागा बिनविरोध झाली असून सर्वसाधारण 10 जागेसाठी 12 अर्ज शिल्लक राहिले आहेत, त्यासाठी ही निवडणूक लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

माशाळे व जावळे या दोन उमेदवारांनी अर्ज माघार घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना माहिती विचारली असता गुरुवारी अधिकृत यादी लावण्यात येणार असल्याचे सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here