सोलापूरचे नियोजित आरोग्य व औद्योगिक सुरक्षा सहसंचालक कार्यालय प्रशासन अधिकाऱ्यांनी पळविले साताऱ्याला :- विष्णु कारमपुरी (महाराज)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूरचे नियोजित आरोग्य व औद्योगिक सुरक्षा सहसंचालक कार्यालय प्रशासन अधिकाऱ्यांनी पळविले साताऱ्याला :- विष्णु कारमपुरी (महाराज)

सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूरात आरोग्य व औद्योगिक सुरक्षा सहसंचालकांचे नियोजित कार्यालय महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या सोयीसाठी साताऱ्याला पळविले आहे . हे कृत शासनाला ( मंत्री महोदय ) यांना अंधारात ठेवून प्रशासन अधिकाऱ्यांनी केलेले कटकार्यस्थान आहे . म्हणून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विषयक सहसंचालक कार्यालय हे सोलापूरातच व्हावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे मा . जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे .
सदर निवेदनात साताऱ्याला करण्यात आलेल्या सहसंचालक कार्यालय हे केवळ स्वार्थापोटी आणि आपले सोयीसाठी केलेले कटकार्यस्थान आहे . कारण औद्योगिक दृष्टी पाहता सातारापेक्षा सोलापूर जिल्हा मोठा आहे . त्याचबरोबर कामगारांची संख्या प्रचंड असून ३६० कारखाने , ११ तालुके , ४ एम.आ.डी.सी. , ९ ते १० कामगार संघटना आणि साखर कारखाने व इतर उत्पादित उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत . सोलापूर हे महानगरपालिका शहर असून केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीत समावेश झालेला आहे . परंतु कामगारांच्या आरोग्य व सुरक्षा , तक्रारी , कारखाने परवाने नुतनीकरण , केंद्रीय माहिती अधिकार २००५ या अंतर्गत आलेल्या तक्रारी असे सर्व कामासाठी सोलापूरकरांना पुणे येथे जावे लागतो . त्यामुळे वेळ व पैसा विनाकारण वाया जातो . यामुळे कारखानदार व कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतो . त्याचबरोबर सर्व कामे प्रलंबित राहतात . म्हणून सोलापूरातच सहसंचालक कार्यालय असणे गरजेचे आहे . व शासनांनी देखील वरील सर्व बाबींचा विचार करून सोलापूरात सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव मान्य केले . परंतु प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी सदर कार्यालय त्यांच्या स्वार्थासाठी सातारा येथे वळविले आहे . हे अत्यंत चुकीचे व सोलापूर जिल्ह्यातील कामगार व उद्योजकांना अडचणीचे व खर्चिक होणार आहे .
तरी माननीयांनी सातारा येते होणारा औद्योगिक व आरोग्य विषयक सहसंचालक कार्यालय हे सोलापूरातच सुरू करावे . ही नम्र विनंती . अन्यथा सदर गैर प्रकाबाबत न्यायालयात दाद मागण्यात येईल . व रस्त्यावरचे आंदोलन करण्यात येईल . असे नमुद करण्यात आले .
विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्ठमंडळात दशरथ नंदाल , विठ्ठल कु – हाडकर , पप्पु शेख , श्रीनिवासा बोगा , गणेश म्हंता , रेखा आडकी , अनिता बटगिरी , संध्याराणी कु – हाडकर, संजीव शेट्टी , रमेश चिलवेरी आदि उपस्थित होते .

सदर निवेदनाचे प्रत मा . मुख्यमंत्री, मा . उपमुख्यमंत्री, मा . मुख्य सचिव यांना पाठविणत आले आहे .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here