सोलापुर शहर युवक काँग्रेसने, राहुलजी गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या हुकुमशाही मोदी सरकारचा पुतळा दहन केला.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोदी नावावर वक्तव्य केल्याबद्दल मोदी सरकारच्या दबावामुळे राहुलजी गांधी यांना सूरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा केली याविरोधात सोलापुर शहर युवक कांग्रेसच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदशनाखाली अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापुर येथे हुकुमशाही मोदींचा पुतळा दहन करण्यात आला.
यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी केली.

यावेळी बोलताना गणेश डोंगरे म्हणाले की, राहुलजी गांधी हुकूमशहाच्या विरोधात आवाज उठवत आहेत. अनेक मोदी नावाचे चोर देशाला लुभाडून पळून गेले त्याविरोधात चुकीला चुकीचे म्हणण्याचे धाडस दाखवत आहे. राहुलजी गांधी यांच्या आवाज दाबण्यासाठी हुकूमशहा मोदी सरकार कधी ईडी, कधी पोलिस, कधी केस, कधी शिक्षा देऊन धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही राहुलजी गांधी घाबरणार नाहीत यपुढेहि हुकुमशाही विरोधात, महागाई विरोधात बेरोजगारी विरोधात, भ्र्ष्टाचार विरोधात विरोधात लढत राहणार, इंग्रजाविरुद्ध लढनारया शहीद भगतसिंग यांनी माफी मागितली नाही त्यांच्याच पावलावर पाउल ठेउन हुकुमशाही मोदी सरकारची माफी कदाफी राहुलजी गांधी मागनार नाहीत.
या आंदोलनात युवक काँग्रेस शहर अध्यक्ष गणेश डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, माजी परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे, महेंद्र शिंदे, शशिकांत शेळके, किरण राठोड, विवेक इंगळे,अशितोष वाले, गणेश वाघमारे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here