सोलापुर शहरात महाविकास आघाडीच्या वतीने महानगपालिका निवडणुक, आणि केंद्रातील भाजपा, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या जनता विरोधी धोरणाविरोधात एकत्र लढनार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राज्यातील काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांसोबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई येथे महाविकास आघाडीची महत्वाची बैठक संपन्न झाली होती.
या बैठकीत आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगपालिका, विधानसभा, लोकसभा, निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय, तसेच केंद्रातील भाजपा सरकारच्या, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या जनता विरोधी धोरणाच्या विरोधात एकत्रितपणे विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यास अनुसरून आज रोजी काँग्रेस भवन सोलापुर येथे सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, शहर प्रमुख विष्णु कारमपुरी, राष्ट्रवादीचे नेते मनोहर सपाटे, प्रमोद भोसले, सुनीता रोटे यांच्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थितीत बैठक होऊन त्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आदेशानुसार आगामी महानगपालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आणि जुनी पेंशन योजनेच्या आंदोलनात एकत्रितपणे सहभागी होणार असल्याचे सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here