सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार; नरेंद्र पाटलांची घोषणा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार; नरेंद्र पाटलांची घोषणा

सोलापूर // प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रविवार ४ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सोलापुरात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील हा सर्वात मोठा मोर्चा राहणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

केवळ मराठा समाजच नाही तर शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चासाठी आम्ही खासदार नारायण राणे, छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  यांना निमंत्रण दिल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. याशिवाय केंद्रीय कायदा मंत्री यांची भेटीसाठी वेळ घेऊन त्यांना मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यासाठी विनंती करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here