सेवा पंधरवड्यानिमित्त अक्कलकोटमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन  खासदार जायसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उदघाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधीजी यांची जयंती हा कालावधी “ सेवा पंधरवडा ” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर, जिल्हा प्रशासन, सोलापूर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान, अक्कलकोट यांच्या संयुक्‍त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधीजीच्या जीवनांशी संबधित घटना, त्यांनी भेट दिलेल्या व सत्याग्रह केलेल्या ऐतिहासिक स्थळाविषयी माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक 01 ते 03 ऑक्टोबर 2022 या कालावधीत अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वाहनतळ जवळील जागेत भरविण्यात आले आहे.
आज या प्रदर्शनचे उदघाटन खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी आणि जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते फित कापून व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले आणि श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थानचे चेअरमन महेशराव इंगळे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शाम मोरे, निवासी नायब तहसिलदार विकास पवार, महावितरणचे उपअभियंता म्हेत्रे तसेच  क्षेत्रीय प्रचार कार्यालयातील कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
खासदार स्वामी म्हणाले की, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या संकल्पनेवर आधारित सेवा पंधरवड़ा निमिताने राज्य  शासनाकडून 14 सेवांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधी यांच्या  जीवनांशी संबंधित महत्वपूर्ण घटना, त्यांनी भेट दिलेल्या व सत्याग्रह केलेल्या ऐतिहासिक स्थळाविषयी माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन हा खूपच चांगला उपक्रम असून या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेली काही छायाचित्रे आजपर्यंत पाहिली नव्हती. हे छायाचित्र प्रदर्शन खूप चांगले व विनामूल्य असून अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भाविकांनी व येथील नागरिकांनी आर्वजून या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रदर्शन भरविल्याबाबत त्यांनी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे कौतुक केले.
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले की,  या सेवा पंधरवडा कालावधीत शासनाच्या विविध विभागातील प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा मोठ्या प्रमाणात होणार आहे. या प्रदर्शनामध्ये महात्मा गांधीजीच्या जीवनांशी संबधित घटना, त्यांनी भेट दिलेली ठिकाणे, तसेच त्यांनी केलेल्या  सत्याग्रह विषयीची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन खूप चांगले असून सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच यातून बोधही घ्यावा, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here