सुशील भैय्या क्षिरसागर यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सुशील भैय्या क्षिरसागर यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन!

(पुळुज येथील अंगणवाडी सेविकांना फेस शिल्ड,मास्क, सॅनिटायझरचे वाटप)

 


सोलापूर // प्रतिनिधी

संपूर्ण जगभरातील जनतेला भंडावून सोडणा-याला कोरोना या रोगाला आळा घालण्यासाठी मोहोळ नगरपरिषद नगरसेवक सुशील भैया शिरसागर यांच्या सहकार्याने SMS चे म्हणजेच , मास्क, व सोशल डिस्टन्सिंगचे पालन कटाक्षाने करणे गरजेचे आहे. तसेच वारंवार हात धुणे सुद्धा गरजेचे आहे. या त्रिसुत्रीनेच आपण सर्वजण एकत्र येऊन कोरोना हद्दपार करू. असे आवाहन मोहोळ नगरपालिकेचे नगरसेवक मा श्री सुशीलभैय्या क्षीरसागर यांनी पुळूज येथे केले. पुळूज गावातील व पंचक्रोशीतील आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, व पोलिस कर्मचारी यांना मास्क, व फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पुळूज पंढरपूर रस्त्यावर जागोजागी बंदोबस्त करण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना सुद्धा मास्क व फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. यावेळी , रतिलाल आप्पा गावडे सरपंच पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोहन खरात माणिक बाबर सरपंच शिवाजी शेंडगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे, तलाठी गायकवाड भाऊसाहेब बंडू बाबर राजू माने दिलावर मुलानी आमिर मुलानी निसार मुलानी शिवाजी सलगर विश्वास सावंत समाधान कांबळे आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.

चौकट

भाजपाचे नेते सुशील भैय्या शिरसागर व सोमेश क्षीरसागर यांनी या महाभयंकर अशा कोणाच्या महामारी मध्ये आमच्या गावाला आजपर्यंत वेळोवेळी चांगल्या पद्धतीने मदत केली आहे त्याच प्रमाणे आमच्यामध्ये तिच्या आवाहनाला सुद्धा त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे त्यांनी कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर गावातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर व पोलिस प्रशासनाला सॅनिटायझर, फेस शील्ड व मास्क ची वाटप करून मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकी जपली आहे.

 दत्तात्रय पांढरे

(अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पुळुज तालुका पंढरपूर)

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here