सुपली गावांना जोडणाऱ्या कासाळओढ्यावरील पुलास शासनाची मंजुरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सुपली गावांना जोडणाऱ्या कासाळओढ्यावरील पुलास शासनाची मंजुरी

(चार कोटी रुपये मंजूर)

सोलापूर // प्रतिनिधी                
               
पंढरपूर तालुक्यातील पळशी सुपली येथील कासाळ ओढ्याला सप्टेंबर 2020 मध्ये महापूर येऊन दोन्ही गावचा व परिसरातील गावांचा एक आठवडाभर संपर्क तुटलेला होता. त्यावेळी शेतीचे व घरांचे खूप मोठे नुकसान झाले होते.

याची दखल घेऊन आमदार प्रशांतराव परिचारक व आमदार शहाजीबापू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सतत पाठपुरावा करून सदर ओढ्यावरील पुलासाठी चार कोटी रुपयास प्रशासकीय मान्यता मिळवली असून टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तांत्रिक बाबी तपासण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू करण्यात आल्याची माहिती भाळवणी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य शोभाताई तानाजी वाघमोडे देशमुख व पंचायत समिती सदस्य संभाजीराजे शिंदे यांनी दिली.

सरकारच्या बजेट निधीतून चार कोटी रुपये मंजूर करून सन 21- 22 मधून 42 लाख 49 हजाराची तरतुद केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यामध्ये सुपली पाटी ते पळशी रस्त्याची दुरुस्ती देखील होणार आहे.

लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात ही होईल त्यामुळे पळशी सुपली सह भाळवणी परिसरातील नागरिकांची सोय होईल. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here