‘सिड बॉल’च्‍या माध्‍यमातून वृक्षारोपन करून पालखीमार्ग हरित करणार उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वन विभाग व माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा उपक्रम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

वन महोत्‍वाअंतर्गत वारकयांच्‍या सोयीसाठी रस्‍त्‍याच्‍या दुतर्फारेल्‍वेकॅनॉलडोंगर मार्गावर सिड बॉलच्‍या (बीज गोळेमाध्‍यमातून वृक्षारोपन करुन हरित वारी उपक्रम राबवित असल्‍याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले.

            अंतरराष्‍ट्रीय पर्यावरण दिनाच्‍या निमित्‍ताने वन विभाग व माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या केंद्रीय संचार ब्‍युरोसोलापूर क्षेत्रीय कार्यालयाच्‍या संयुक्‍त विदयामाने सिड बॉल तयार करणेबाबत कार्यशाळा घेण्‍यात आली होती. यावेळी संगमेश्‍वर कॉलेजचे विदयार्थी व पर्यावरण प्रेमी यांनी 5000 हजार पेक्षा जास्‍त सिड बॉल तयार केले होते. त्‍याचे वाटप आज माळशिरस तालुक्‍यातील खुडूस वन विभागाच्‍या रोपवाटीके समोर करण्‍यात आले. यावेळी क्षेत्रीय प्रसिध्‍दी अधिकारी श्री. अंकुश चव्‍हाणसहाय्यक वनसरक्षक बी.जी.हाकेवनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद हाकेसंजय भोईटे व प्रकाश कुंभार अद‍ि उपस्थित होते.

          सदरील बिज गोळे हे स्‍थानिक प्रजातिच्‍या बियापासून तयार करणेत आलेले आहेत. वारकरी हे बिज गोळे सोबत घेउन जाउु शकतात. सदरील बिज गोळे वारकयांनी वारीच्‍या प्रवासादरम्‍यान पालखी मार्गावर फेकावेत जेणेकरुन नवीन वृक्षसंपदा तयार होईल. सदरील सिड बॉल मध्‍ये प्रामुख्‍याने वडपिंपळकडूलिंबअंजनखैरशिसू यांचे बिज वापरले आहेत. जेणे करून सावली देणारे वृक्ष तयार होतील. सदरील उपक्रमासाठी प्रकाश कुंभार यांनी पर्यावरण पूर्वक बॅक मोफत उपलब्‍ध करुन दिले. सदरील बीज गोळे वाटप कार्यक्रमाची सुरूवात श्री क्षेत्र आळंदी पासून करून खुडूस रोपेवाटीके समोर समारोप करण्‍यात आला.       

कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी आरएफओदयानंद कोकरेराजेंद्र आठवलेएपीआय नातेपुतेचे मनोज सोनवालकर हरिशचंद्र साळुंखेपल्‍लवी संजय लडाकतकल्‍पना पांढरेशिला भोजगेंराजकुमार जाधवकरामत अली शेखगणेश जगदाळेधनंजय देवकरदादासाहेब चंदनशिवे यांनी परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here