साहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

साहेब आत्ता जुळवून घ्या पुढचा काळ फार कठीण आहे:-आ.प्रताप सरनाईक

 

आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल’ असं म्हणत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
अवैध मालमत्ता प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहिले आहे.

या पत्रामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेनेत खळबळ उडाली आहे. या पत्रात आमदार प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून होत असलेल्या त्रासामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करावी अशी विनंती केली आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना पक्ष फोडत आहेत. त्यामुळे भाजपशी युती करावी जेणे करून केंद्रीय सुरक्षा यंत्रणाचा ससोमिरा टाळता येईल’ असं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात म्हटलं आहे.

तसंच, ‘पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.’ असंही सरनाईक म्हणाले आहे.

‘कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे “माजी खासदार” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे त्याला कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबीयांवर सुद्धा सतत आघात होत आहे, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंजवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल, अशी व्यथाही सरनाईक यांनी मांडली.
दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी लिहिलेलं पत्र हे ED च्या दबावाखाली लिहिलं असल्याचं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here