साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे मित्र मंडळ व पुरोगामी संघर्ष परिषद यांच्या वतीने मोफत ३०० गणवेश, ३००मास्कचे वाटप!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे मित्र मंडळ व पुरोगामी संघर्ष परिषद यांच्या वतीने मोफत ३०० गणवेश, ३००मास्कचे वाटप!

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.लोकशाहीर आण्णा भाऊ साठे मित्र मंडळ व पुरोगामी संघर्ष परिषद यांच्या वतीने मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर गावातील 11 अंगण वाडीला मोफत ३०० गणवेश व ३०० मास्कचे वाटप विद्यार्थ्यांना मा.पवन (भैय्या) महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिलदादा चव्हाण, पुरोगामी संघर्ष परिषदेचे मोहोळ तालुक्याध्यक्ष सुनिल ताकतोडे, संतोष चव्हाण,दिपक चव्हाण,दिपक कदम,भीमशाहीर देविदास बंगाळे यांचा गाण्याचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी भीमा परिवाराचे युवानेते,मा. पवन (भैय्या) महाडिक,भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण, कृष्णाजी गायकवाड,
भिमराव वसेकर, पोपट सोनटक्के, संतोष चव्हाण,दिपक कदम,विनायक गायकवाड, नितीन चव्हाण,सिध्दुबापु अनुसे,भाऊ वसेकर, विष्णू गायकवाड आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here