सामान्यांनी जगायचे कसे?-विजय कदम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

मुंबई:- उज्वला योजने तर्फे गॅस सिलेंडर मोफत देण्यात आले. केंद्र सरकारने ऐपत नाही त्यांना गॅस सबसिडी देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ग्राहकाचे सबसिडी चे पैसे सरळ बँकेत जमा होत होते. परंतु मागील वर्षा पासून सबसिडी बँकेत जमा होत नाही. ह्या कोरोना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबई मध्ये १ सप्टेंबर २०२० ला ५९४ मिळणारा सिलेंडर आता जुलै २०२१ ला ८३४ रु ला मिळत आहे. वर्षभरात २४० रु ची वाढ झाली आहे. तरी कोरोना काळात लाखोंच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आणि आता सबसिडी शिवाय गॅस घ्यावयास लागत आहे. अश्या महागाईत सर्व सामान्यांनी जगायचे कसे?असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विजय कदम यांनी सरकारला केला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here