सामाजिक कार्यकर्ते उमेश सर्वगोड यांच्या वाढदिवसा निमित्त आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते सत्कार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सामाजिक कार्यकर्ते उमेश सर्वगोड यांच्या वाढदिवसा निमित्त आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते सत्कार

सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूर येथील सांगोला चौक परिसरातील भीमशकी चौक मधील भीमशक्ती सांस्कृतिक, शैक्षणिक,कलाव क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ ,भावी नगरसेवक उमेश सर्वगोड यांच्या वाढदिवसानिमित्त आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
   
या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरीत विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये सकाळी10वाजता नवरंगे बालकाश्रम येथील मुलांना खाऊवाटप,सकाळी11 वाजता माऊली शहरी बेघरातील लोकांना अल्पोपहार, 12 वाजता गोपाळपूर येथील वृद्धाश्रममध्ये अन्नदान,दुपारी 12:30 वाजता ठाकरे चौक येथील रामकृष्ण हरी वृद्धाश्रमात अन्नदान,तसेच दुपारी एक वाजता पालवी संस्थेच्या मुलांसाठी धान्यवाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
   
गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता भीमशकी चौक येथे मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने उमेश सर्वगोड यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहनही भीमशक्ती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here