श्री संत दामाजी कारखान्याकडे कोणताही प्रकल्प नसल्यामुळे कारखाना चांगला चालवणे हे आमच्या समोरील आव्हान होते. ते आव्हान आम्ही पहिल्या गळीत हंगामात चांगल्या पद्धतीने पार पाडले.
साखर कमी केल्याचा निर्णय हा काय कायमस्वरूपी नाही. भविष्यात कारखान्याला चांगले दिवस आल्यास त्यामध्ये बदल करू असा विश्वास दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिला.
निंबोणी येथे कार्यक्रमासाठी जात असताना कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल भाळवणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळी विष्णू चौगुले, श्रीरंग माने, पांडुरंग चौगुले, वसंत माळी, लक्ष्मण गायकवाड,सुभाष शिंदे,परमेश्वर गाडीवडर, जालींदर गायकवाड,नामदेव कांबळे, विश्वंभर मोरे, महादेव लोखंडे, महादेव साखरे,सहायक सतीश पाटील, आदी उपस्थित होते.
उपस्थित ग्रामस्थांची संवाद साधताना अध्यक्ष पाटील म्हणाले की, यापूर्वी दामाजी कारखान्यांमध्ये संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली यंदा देखील कारखान्यासमोरील कर्जाचा डोंगर व इतर समस्या पाहता
कारखान्याची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती परंतु अनपेक्षित रित्या तालुक्यातील जाणकार लोकांच्या आग्रहास्तव व सभासदांनी दिलेल्या विश्वासामुळे निवडणूक लढण्याची वेळ आली.
त्या निवडणुकीत सभासदांनी दिलेल्या संधीमुळे कारखान्याचे कामकाज करत असताना जिल्ह्यात सगळ्यात आदी ऊस उत्पादकाचे देयके मार्च अखेर पुर्वी अदा करून ऊस उत्पादकांना त्यांचे बॅक व्यवहार सुरळीत करणे शक्य केले.
व कामगारांचे पगार दिले आहेत, कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे देखील पैसे देत बंद पडलेली कामगार पतसंस्था देखील सुरू केली असे अनेक चांगले उपक्रम पहिल्या हंगामात केले,
ते उपक्रम सभासदांच्या पसंतीला उतरले कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धक कारखाने देखील मोठे असताना देखील दामाजी कारखान्याची गाळप क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.
पहिल्या वर्षात केलेल्या समाधानकारक कामकाजामुळे पुढील वर्षी देखील उत्पादकांकडून दामाजीला गाळपासाठी अपेक्षित ऊस मिळू शकेल असे काम अशा पद्धतीने दामाजीचा कारभार केला आहे.
सध्या मागील संचालक मंडळांनी शिखर बँकेचे काढलेल्या कर्जातील काही रक्कम भरण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
महादेव साखरे यांनी साखरेची सध्याची बाजारातील परिस्थिती पाहता दरवाढ मान्य करत सभासदाची प्रतिकिलो साखर पुर्ववत करा अशी मागणी केली असता सभासदांना साखर कपातीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून भविष्यात चांगले गाळप होऊन परिस्थितीत सुधारणा झाल्यास त्यामध्ये बदल करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी देखील आमचे संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचा विश्वास त्यांनी दिला.