जिल्हा परिषदेच्या तपासणीसाठी आलेल्या पंचायत राज समितीचे विभागून जिल्ह्यात दौरे होते. त्यामध्ये सदाभाऊ खोत यांच्यासोबत काही आमदार हे सांगोला तालुक्यात होते. त्याठिकाणी सदाभाऊ खोत यांचे पुर्वीचे सहकारी मित्र हाॅटेल मालकाने सदाभाऊंना अडवले आणि 2014 साली लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना जेवण दिले तेव्हाचे माझ्या हॉटेलचे जुने बिल द्या म्हणून त्या व्यक्तीने सदाभाऊ खोत यांना चांगलेच हैराण केले.
सदाभाऊ खोत हे फोन केला तर उचलत नाहीत आणि पैसे ही दिले नाहीत म्हणून या हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवून उदारीचे पैसे मागण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेने सदाभाऊ खोत यांची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.
हा विषय संपूर्ण जिल्ह्यात आणि जिल्हा परिषदेमध्ये चर्चेचा ठरला आहे. कसेबसे सदाभाऊंनी त्या व्यक्तीपासून आपली सुटका करून घेतली.
चौकट
झालेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली असता ह्या व्यक्तींला मी ओळखत नाही म्हणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे.आणि त्यांचे खापर मात्र महाविकास आघाडीवर फोडण्यचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.