सहाय्यक कामगार आयुक्त येलगुंडे यांची तडका फडकी बदली.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सहाय्यक कामगार आयुक्त येलगुंडे यांची तडका फडकी बदली.
महाराष्ट्र कामगार सेनेच्या तक्रारीची कामगार मंत्र्यांनी घेतली दखल 

सोलापूरचे भ्रष्ट सहाय्यक कामगार आयुक्त श्री. निलेश येलगुंडे यांची तडका फडकी बदली. महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने येलगुंडे यांच्या विरोधात बांधकाम कामगार नोंदणीत केलेल्या भ्रष्टाचार आणि शासनाचे कोट्यावधी रुपयाचा आर्थिक नुकसान केल्या संदर्भी गेल्या सहा महिन्यांपासून येलगुंडे व त्यांच्या कार्यालयीन सहकारी किर्ती देऊळकर आणि खाजगी दलालांच्या संघनमताने करण्यात आलेल्या गैर कारभाराची चौकशी होऊन कारवाई करावी. या मागणीसाठी अखंड आंदोलन करून पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री मा.ना.श्री. हसन मुश्रीफ साहेब यांनी येलगुंडे यांचा तडका फडकी सोलापुरातुन बदली केली. अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने बांधकाम क्षेत्रातील कामगारांना आर्थिक, सामाजिक, आरोग्य आणि संरक्षण या मिळावे म्हणून बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करून त्या माध्यमातुन न्याय देण्याचा प्रयत्न केला, मात्र या योजनेत सामिल होण्यासाठी संबंधीत जिल्हातील सहाय्यक कामगार आयुत्कांकडे नोंदणी करणे बंधनकारक ठेवले. त्याचाच फायदा घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व लिपीक किर्ती देऊळकर मॅडम आणि खाजगी दलालांच्या संघनमताने बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत महाराष्ट्र कामगार सेना व सोलापूरातील इतर कामगार संघटनांनी येलगुंडे यांच्या विरुध्द तक्रारी दाखल केल्या. या तक्रारी वरुन अप्पर कामगार आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समीतीद्वारे चौकशी केलेल्या अहवालात देखील येलगुंडे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्याचबरोबर मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांनीही येलगुंडे यांच्या बेकायदेशीर व मनमानी कारभाराचे अहवाल पाठविले. अशा सर्व स्थरातुन येलगुंडे यांच्या विरोधात मागणीचा जोर धरला म्हणुन भ्रष्ट अधिकारी निलेश येलगुंडे यांची बदली तडका फडकी करण्यात आली.
येलगुंडे यांच्या बदली झाल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here