सहकार शिरोमणी, श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी पॅनल कडून २० जणांची उमेदवार यादी जाहीर!
अभिजीत आबा पाटील गटाकडून आजी-माजी व विद्यमान सर्व नेत्यांना उमेदवारीची लॉटरी
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना गणल्या गेलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये आज दिनांक 5 जून 2023 रोजी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी, उद्योगपती विठ्ठल चे चेअरमन अभिजीत आबा पाटील अड दीपक दादा पवार व डॉ. बीपी रोंगे सर यांच्या संयुक्तिक सहकार शिरोमणी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी कडून सर्व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामध्ये भाळवणी गट क्रमांक एक मधून दिपक दामोदर पवार, जैनवाडी, विजय रघुनाथ भिंगारे नांदोरे, महादेव उत्तम देठे राहणार धोंडेवाडी,
त्याचबरोबर भंडीशेगाव गट क्रमांक ०२ मधून बाबासाहेब शिवाजी काळे वाडीकुरोली, बाळासाहेब सदाशिव कौलगे, बिभीषण दाजी दादाराव पवार,
गादेगाव गट क्रमांक ०३ मधून, वाखरीचे, सौदागर भानुदास गायकवाड रोपळे येथील युवा नेते विलास शिवाजी पाटील, कौठाळी मधून शिवाजी हनुमंत नागटिळक,
त्याचबरोबर कासेगाव गटातून बब्रुवान पांडुरंग रोंगे (सर), भारत विठ्ठल भुसे कासेगाव, महादेव निवृत्ती आसबे तावशी, सरकोली गटातून श्रीनिवास कृष्णा भोसले सरकोली, दत्तात्रय रामा शिंदे आंबे, नंदा रामचंद्र मोरे मुंढेवाडी, त्याचबरोबर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मधून ज्ञानोबा रामचंद्र खरडकर, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी रायाप्पा धोंडीबा हरणवळ, महिला राखीव प्रतिनिधी म्हणून सौ.अनिता नंदकुमार बागल, तसेच तुंगतचे, वैशाली पंकज लामकाने, विशेष जाती जमाती प्रवर्गातून प्रतिनिधी म्हणून सौ सुनंदा राजाराम शिखरे या सर्व उमेदवारांना उमेदवारीची लॉटरी लागली असून यामध्ये अनेक तुल्यबळ लढती होणार असून सर्वात जास्त लक्ष हे कासेगाव गादेगाव भाळवणी या गटावर राहणार असल्याचे दिसत आहे.