सहकार शिरोमणी परिवाराच्या प्रतिष्ठेची लढाई आहे:समाधान काळे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सहकार शिरोमणी परिवाराच्या प्रतिष्ठेची लढाई आहे.. समाधान काळे

पंढरपूर सहकार शिरोमणी वसंत दादा.काळे सहकारी साखर कारखाना या कारखान्याची निवडणूक ही आपल्या सहकार शिरोमणी परिवाराच्या प्रतिष्ठेची लढाई असून कार्यकर्त्यांनी गाफील न राहता प्रत्येक, सभासद, पर्यंत पोहचून आपली भूमिका समजून सांगावी अशी आव्हान विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान दादा काळे यांनी केले.

सहकार शिरोमणी वसंतदादा काळे साखर कारखाना लिमिटेड वसंत नगर, भाळवणी ता. पंढरपूर निवडणुकी संदर्भात सहकार शिरोमणी परिवारातील सर्व कार्यकर्त्याची विचारविनिमय बैठक पंढरपूर येथील यशवंतराव चव्हाण नागरी पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते महादेव देठे हे होते.

यावेळी समाधान दादा काळे म्हणाले की प्रत्येक कार्यकर्ता चेअरमन आहे, कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, काळ बदलला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्यामध्ये बदल करून वीस वर्षापूर्वी स्वर्गीय वसंतदादा काळे यांनी केलेल्या सामाजिक कामाची जाणीव करून आपली भूमिका स्पष्ट समजून सांगावे, कल्याणराव काळे साहेबांनी सभासद व कार्यकर्त्यांना आर्थिक सामाजिक सहकार्य करण्याचे काम केले आहे, सहकार परिवार मोडीत काढण्याचे काम विरोधक करीत असून जशास तसे उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहिले पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्यांनी कल्याणराव काळे म्हणून काम करावे लागणार आहे. कल्याणराव काळे जो निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांनी मान्य करावाचे आवाहन समाधान दादा काळे यांनी केले.

या बैठकीचे प्रास्ताविक सुधाकर कवडे यांनी केले..

यावेळी सहकार शिरोमणी कारखान्याचे व्हा. चेअरमन राजेंद्र शिंदे यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे,बाळासाहेब काळे, गोरख जाधव, नागेश फाटे सुरेश देठे, भारत कोळेकर, अण्णा शिंदे, मोहन नागटिळक, महादेव देठे जयसिंग देशमुख, दिनकर कदम, तानाजी जाधव, राजू जगदाळे, सुनील पाटील, हनुमंत दांडगे, बाळू माने यांच्यासह परिवाराचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here