सहकार शिरोमणी कारखान्यात परिवर्तनाचा एल्गार वाडीकुरोलीत सभासदांचा मोठा प्रतिसाद ज्या पद्धतीने श्री विठ्ठल कारखाना चालवला त्याच पद्धतीने सहकार शिरोमणी कारखाना यशस्वी चालून सभासद, कामगारांना न्याय देणार सहकार शिरोमणीची थकीत ऊस बिल दिल्याशिवाय कारखाना सुरू करणार नाही.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून सत्ताधारी पॅनल च्या विरोधात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा पॅनल उभा असल्याने काल स्व.वसंतराव दादा काळे यांच्या वाडीकुरोली गावातूनच पहिली विचार विनिमय बैठक घेण्यात आली.

स्व.वसंतदादा काळे यांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून माय माऊलींनी औक्षण करून अभिजीत पाटील यांचे हलगीच्या जल्लोषात वाडीकुरोली ग्रामस्थ सभासदांनी स्वागत केले.

इथं विकासाचा एक वेगळाच पॅटर्न बनलाय! तो म्हणजे ‘कारखाना चालवणारा माणूस’ इथं बंद असलेला साखर कारखाना कसा चांगला चालवला जाईल आणि शेतकरी, कामगारांना प्रामाणिकपणे न्याय देता येईल हाच विचार येथील शेतकरी सभासद व सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

त्याच धर्तीवर आपण श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीमध्ये मायबाप सभासदांनी निवडून दिल्यानंतर कारखाना चालू करायच्या अगोदर थकीत ऊस बील देण्याचे काम देखील आपण प्रामाणिकपणे केले आहे. श्री विठ्ठल परिवारातील सहकार शिरोमणी हा एक भाग असून त्या सभासदाला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी विठ्ठल प्रमाणेच राहील असे अभिजीत पाटील म्हणाले.

श्री विठ्ठल प्रमाणेच सर्व गोष्टी सहकार शिरोमणी कारखान्याच्या देखील प्रामुख्याने करण्यात येतील थकीत बिले, कर्मचाऱ्यांचे राहिलेले थकीत पगार, तसेच वाहतूक ठेकेदाराचे बिल व इतर देणी देण्याची भूमिका या ठिकाणी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.

अभिजीत पाटील गटामध्ये तरुणांची फौज आणि सर्वसामान्य सभासदांना विश्वासात घेऊन वाडीकुरोली येथील विकास सोसायटीचे सदस्य विठ्ठल निवृत्ती काळे तसेच बंडू लक्ष्मण साळुंखे (खेडभाळवणी), संतोष भालचंद्र गाजरे, बापूनाना वामन गाजरे, नबीलाल शेख, विठ्ठल गाजरे (शेळवे) तसेच एकलासपूर मा.सरपंच बाळासाहेब शिवाजी ताड, संपत झांबरे (पळशी) या सह सोमनाथ गोरे(आढीव) यांनी अभिजीत पाटलांच्या कार्यशैलीवर व कार्यावर विश्वास ठेवून गटांमध्ये प्रवेश केला यामुळे भालके व काळे गटाला मोठा धक्का मिळाला आहे.

यावेळी स्वेरीचे सचिव बी.पी.रोंगे सर, श्री विठ्ठल कारखान्याच्या व्हा. चेअरमन प्रेमलता रोंगे, यशवंत पाटील, संचालक धनंजय काळे, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले विष्णू भाऊ बागल,शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील रामचंद्र वाघ, बाबासाहेब काळे, अर्जुन काळे, दादा पाटील, प्रमोद काळे, विठ्ठल काळे, मोहन काळे, पांडुरंग काळे, नितीन काळे, सचिन काळे, मारुती काळे, समाधान पाटील, चंद्रकांत काळे, अविनाश काळे यासह सभासद, शेतकरी बांधवासह, विविध संघटनेचे पदाधिकारी, तरूण वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here