सहकार शिरोमणीच्या निवडणुकीमध्ये रोंगे पाटील पवार गटाचे अर्ज फेटाळले (“सहकार-शिरोमणी” या निवडणुकीत मोठी उलथा-पालथ)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

निवडणुक निर्णय आधिकाऱ्याने नामंजुर केलेला उमेदवारी अर्ज मंजुर करण्यासाठी अभिजीत पाटील गटाचे वतीने प्रादेशिक सह संचालक (साखर) सोलापूर यांचेकडे केलेले अपील फेटाळत त्या आठ उमेदवारांची उमेदवारी नामंजुर केली आहे. यामुळे पाटील गटाला धक्का बसला आहे.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे प्रक्रिया सुरु असून निवडणुक निर्णय आधिकारी यांनी अभिजीत पाटील गटाच्या धनंजय उत्तम काळे, हणमंत महादेव बागल , पोपट माणिक पवार, योगेश बाळासाहेब होळकर, ज्ञानेश्वर निवृत्ती माने, दामोदर यशवंत चौगुले, रावसाहेब महादेव निकम, रमेश मधुकर नाईकनवरे यांचे उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय आधिकाऱ्यांना कारखान्याकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे तांत्रिकबाबी लक्षात घेवून नामंजुर केले होते. हे अर्ज मंजुर करण्यासाठी पंढरपूर येथे निवडणुक निर्णय आधिकारी यांचे समोर झालेल्या सुनावणीत नामवंत विधिज्ञांनी युक्तीवाद केले होते त्यानूसार हे अर्ज नामंजुर करण्यात आले होते. याच वेळी उमेदवारी अर्जावर हरकत घेतलेले ब्रबुवान रोंगे, दिपक पवार, कल्याणराव काळे यांचे अर्जावरही गैरअर्जदारांनी आक्षेप नोंदविले होते मात्र निवडणुक निर्णय आधिकारी यांनी वरील तीन अर्ज मंजुर केले होते.

नामंजुर अर्जदारांच्यावतीने सोलापूर येथील प्रोदशिक सह संचालक (साखर) विभाग यांचेकडे केलेल्या अपीलाची सुनावणी दि.29 मे रोजी झाली यावेळीही अर्जदाराचे वतीने ॲङभोसले व ॲङरोंगे तर कारखान्याचे वतीने ॲड.राजेश भादुले यांनी युक्तीवाद केला. सुनावणी दरम्यान युक्तीवादानूसार अपीलय आधिकाऱ्यांनी वरील आठ उमेदवारांचे अर्ज नामंजुर केले.

सदर घटनेमुळे अभिजीत पाटील गटाला धक्का बसला असून वरील उमेदवारांची उमेदवारी रदद झाल्याने त्यांना आता त्या जागेसाठी पर्यायी उमेदवारीची व्यवस्था करावी लागणार आहे. हे करताना नाराज झालेल्या उमेदवारांची समजुत काढताना पाटील यांची दमछाक होणार आहे अशी चर्चा सर्वत्र चालु आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here