सव्वापाचशे महिलांच्या उपस्थित हळदीकुंकू समारंभ संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सव्वापाचशे महिलांच्या उपस्थित हळदीकुंकू समारंभ संपन्न.

भोसे येथे सणसमारंभाच्या निमित्ताने एकत्र येवून एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, आपल्याशी हितगुज करता यावी तसेच आपल्या भारतीय परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने तिळगुळ व हळदीकुंकू समारंभ आयोजित केला असून भविष्यात कायमच मी आपल्या संपर्कात राहीन अशी ग्वाही रश्मी गणेश पाटील यांनी दिली.

यावेळी संजीवनी पाटील, संयोगिता पाटील, सारिका गावंधरे, ग्रा. सदस्य ज्योती माने, उमरावती वाघमोडे आदि उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, स्व. राजुबापुंच्या निधानंतर प्रथमच मी आपल्यासमोर येत आहे. माणसात मिसळल्यानंतर माणस आपलीशी होतात त्यांच्या सुखदुखाची जाणीव आपल्याला होते या स्व. राजुबापुंच्या शिकवणुकीची प्रचीती आज आपली उपस्थिती पाहून आली. यावेळी त्यांच्या भावना दाटून आल्या.

 

यावेळी सव्वापाचशे महिला उपस्थित होत्या. या सर्व महिलांना तिळगुळ व कृषिराज शुगरच्या वतीने गुळ पावडर देण्यात आली.

यशवंत सभागृहात मकर संक्रांती निमित्त तिळगुळ व हळदीकुंकू समारंभावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन रश्मी पाटील, संजीवनी पाटील, संयोगिता पाटील, सारिका गावंधरे, ग्रा. सदस्य ज्योती माने, उमरावती वाघमोडे, अविंदा मस्के आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन बँक सखी सुजाता वगरे यांनी केले, प्रास्ताविक सविता कामाने यांनी सूत्रसंचालन मनीषा जवळ यांनी केले तर उपस्थित महिलांचे आभार ग्रामपंचायत सदस्य शिवगंगा कोरके यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here