सर्व सामान्याना पुन्हा एकदा शाॅक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(महाराष्ट्रराज्यात विजेच्या दरात मोठी वाढ)

वृत्तसंस्था // प्रतिनिधी

राज्यातल्या वीज ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. वीज दरवाढ अटळ असल्याचे म्हटलं जात आहे.  विजेचे दर 7.25 वरून 12 रूपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.  खासगी कंपन्यांकडील कोळसाही संपू लागला आहे.  राज्य सरकारचा खुल्या बाजारातून वीज खरेदीचा विचार केला जात आहे. 

कोळशाअभावी राज्यातले औष्णिक वीज प्रकल्प बंद पडत आहेत. त्यातच आता खासगी कंपन्यांकडचा कोळसाही संपायला लागलाय. कंपन्यांकडे ६ दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे. त्यामुळे सरकार खुल्या बाजारातून वीज खरेदीचा विचार करत आहे. कंपन्या या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. विजेचे दर ७.२५ पैसे प्रतियुनिटवरून थेट १२ रूपयांवर जाण्याची शक्यता आहे. इंडियन एनर्जी एक्स्चेंज म्हणजे खुल्या बाजारातही वीज दर वाढण्याची शक्यता आहे.  

देशातील अनेक राज्य कोळशाच्या कमतरतेमुळे विजेचं संकट निर्माण होण्याचा दावा करत आहे. मात्र केंद्र सरकारने हा दावा फेटाळून टाकला आहे. त्यामुळे देशात खरंच वीज संकट निर्माण झालं आहे की? विरोधी पक्षाने सरकार विरोधात भ्रम निर्माण केलाय.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here