सरस्वती विद्यालय व कर्मवीर भीमराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालय टाकळी सिकंदर मध्ये संस्थेचे सर्वेसर्वा आमचे मार्गदर्शक संसदरत्न खासदार मा.श्री धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडीक यांच्या ” वाढदिवसानिमित्त” विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुधीर (भाऊ) भोसले व पंढरपूरचे प्रख्यात कर सल्लागार व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन
माझी अध्यक्ष मा.श्री संजय अभ्यंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच भिमा सहकारी साखर कारखान्याचे नुतन संचालक व नुकतीच सोलापूर जिल्हा नियोजन समिती मध्ये सदस्यपदी निवड झालेबददल मा.श्री.सुनिल (दादा) चव्हाण यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी विद्यालयात कबड्डी,खोखो,इतर वैयक्तिक क्रिडा स्पर्धांचे शुभारंभ प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रास्ताविक शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य श्री राजीव यादव सर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री जाधव सर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाबर सर यांनी केले तसेच दिवसभर क्रिडा स्पर्धा चालू होत्या पंच म्हणून विद्यालयाचे क्रिडा शिक्षक श्री जावळे सर,श्री मोरे सर यांनी काम पाहिले
यावेळी आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते सर्वच शिक्षक/ शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.