सरकारने वारकऱ्यांचा पाच हजार रुपये मानधनाविषयी संभ्रम दूर करावा – विश्व वारकरी सेना

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सरकारने वारकऱ्यांचा पाच हजार रुपये मानधनाविषयी संभ्रम दूर करावा – विश्व वारकरी सेना

(सातबारा कोरा करण्यात येईल अश्या फसवी आश्वासना सारखे सरकार वारकऱ्यांना आशेवर तर ठेवणार नाही ना?)

सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्रातील बऱ्याच वारकरी संघटनांनी महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी वारकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता आर्थिक स्वरूपाच्या मदतीची मागणी केलेली आहे पण वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने मुंबई येथे विधान भवनात मीटिंग घेण्यात आली आणि मीटिंग नंतर वारकरी साहित्य परिषदचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी काही वृत्तपत्राच्या माध्यमातून माहिती दिली की, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय मधील गायक, वादक, कीर्तनकार यांना प्रतिव्यक्ती दरमहा पाच हजार रुपये मानधन आणि फडकरी मंडळींना दरमहा 30 हजार रुपये मानधन हे कायमस्वरूपी मिळणार आहे ही बातमी पुर्ण महाराष्ट्रभर वार्‍यासारखी पसरली परंतू या बातमीमुळे वारकरी संप्रदाय मध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. ज्या महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल असे आश्वासन दिले आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांचा सातबारा अजूनही कोरा झाला नाही एवढेच काय तर आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे फार मोठे नुकसान झालेले आहे पण अजून पर्यंत शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिलेला नाही अशातच महाराष्ट्रामध्ये किमान पाच लाख गायक-वादक कीर्तनकार आहेत एवढ्या मोठ्या मंडळींना सरकार प्रतिव्यक्ती पाच हजार रुपये दरमहा मानधन देऊ शकेल का आणि सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसा आहे तरी का? तरीपण सरकार जर वारकरी सांप्रदायला सहकार्य करायला तयार असेल तर विश्व वारकरी सेनेच्या वतीने आम्ही सरकारचे मनापासून अभिनंदन करतो पण आपण मानधन कोणत्या योजनेच्या माध्यमातून देणार आहात? किती तारखे पासून चालू होणार आहे. हे अर्ज भरण्याकरिता आपण वारकरी साहित्य परिषदेला अधिकृत परवानगी दिली आहे का? आपण महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटनांना अर्ज भरण्याकरिता सांगणार आहात किंवा महाराष्ट्रातील गायक ,वादक, कीर्तनकार महाराज मंडळींचे अर्ज भरण्याकरिता आपण प्रशासकीय यंत्रणा राबवणार आहात का? आणि पाच हजार मानधन मिळणार या लालसेपोटी ज्यांच्या गळ्यात माळ नाही ते ही वेळेपुरते माळकरी होण्याची शक्यता आहे आणि ही योजना राबवित असताना यामध्ये खरोखर निष्ठावंत वारकऱ्यांचा समावेश केला जाईल कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी होता कामा नये व काही मंडळी अर्ज भरण्याच्या करिता वारकऱ्यांच्या जवळून दोनशे रुपये, पाचशे रुपये घेतात असे प्रकारही दिसून येत आहेत या सर्व प्रकाराला आळा घालण्यात येणार का? याचा रीतसर खुलासा करावा आणि या योजनेमध्ये विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक तबला पेटी वादक यांचाही समावेश करावा ही नम्र विनंती विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांच्या वतीने करण्यात येत आहे अशा आशयाचे निवेदन विश्व वारकरी सेनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धव राज ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख साहेब यांना ई मेल द्वारे पाठवण्यात आले आहे.

 

चौकट:-

वारक-यांच्या पाच हजार रूपये मानधना बाबत संभ्रम दुर करावा

राज्यातील विविध वारकरी संघटनांनी वारक-यांना आर्थिक मदत करावी यासाठी मागणी केली होती.वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील यांनी वारकरी,फडकरी यांना दरमहा मानधन मिळणार अशी बातमी प्रसारीत केली होती या बातमीने संपुर्ण वारकरी सांप्रदायामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे तरी विठ्ठल पाटील यांनी विचार करून सर्व वारक-यांमध्ये झालेला संभ्रम दुर करावा.

-:ह.भ.प.गणेश महाराज शेटे
विश्व वारकरी सेना

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here