समृध्दी ट्रॅक्टर्सचे तीन ग्राहक ठरले मानकरी सोनालीका ट्रॅक्टर्स कंपनीकडून देशभरातील ग्राहकांसाठी लकी ड्रॉ सोडत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोनालिका ट्रॅक्टर कंपनीच्यावतीने जुन 2022 या महिन्यामध्ये देशभरातून ट्रॅक्टर खरेदी करणार्‍या खरेदीदारांमधून लकी ड्रॉ चे आयोजन केेले होते. त्यानुसार मंगळवार दि.20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने लकी ड्रॉ ची घेण्यात आला व हर्षदा लॉन्स सांगोला येथे बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला समृध्दी ट्रॅक्टर्स पंढरपूरच्या सांगोला शाखेतील दोन आणि पंढरपूर मधील एक ग्राहक सोडतीचे मानकरी ठरले असुन त्यांना सोन्याचे बक्षीस मिळाले आहे.
झालेल्या सोडतीमध्ये सांगोला तालुक्यातील सुरेखा बाजीराव गायकवाड व बामणी येथील गजानन अंकुश उबाळे यांना प्रत्येकी 20 ग्रॅम सोने तर बाळी श्रीरंग मुळे यांना 1 ग्रॅम सोने असे समृध्दी ट्रॅक्टर्सचे तीन ग्राहक बक्षीसाचे मानकरी ठरले आहेत.
या सांगोला शाखेच्या वतीने चालू सप्टेंबर महिन्या करीता खरेदीदारांसाठी समृध्दी ट्रॅक्टर्सच्या वतीने प्रति 10 ग्राहकांमधून लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. या लकी ड्रॉ मध्ये बंडु रंघुनाथ साळुंखे रा.पारे.ता.सांगोला यांना पहिले बक्षीस मोटारसायकल मिळाले आहे. पाचेगाव ता.सांगोला येथील बाळासाहेब राजाराम मिसाळ यांना द्वितीय क्रमांकाचे सोलर वॉटर हीटर तर तिसर्‍या क्रमांकाचे आटाचक्की हे बक्षीस प्रभाकर मारुती वाघमारे यांना मिळाले आहे. यातील उतेजर्नाथ मानकरी ग्राहकांना विशेष गिप्ट देण्यात आले आहे.
या सोडतीच्या वेळी सोनालीका ट्रॅक्टर्स कंपनीचे बलजींदल सिसोदिया, सुबोध शर्मा, सचिन दराडे, ओमप्रकाश दुधाटे, धाराशीव साखर कारखान्याचे संचालक अभिजीत कदम, सोमनाथ केसकर, बाळासो मोरे, राजेंद्र जगताप, हरी डुबल, हणमंत कोरे यांच्यासह शेतकरी बांधव आणि कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here