समृद्धी ट्रॅक्टर्स तर्फे हंगामातील ट्रॅक्टर खरेदीवर लकी ड्रॉ! (दोन चाकी मोटार सायकल, पाण्याचे सोलर, अटा चक्किसह केले आकर्षक बक्षिसांचे वाटप)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठल परिवाराचे नेते आणि श्री विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्याकडे असलेल्या सोनालीका कंपनीच्या ट्रॅक्टर खरेदीवर समृद्धी ट्रॅक्टर एजसीच्या वतीने, चालू हंगामातील खरेदीवर खास मोठ्या किमतीचे वस्तूचा लकी ड्रॉ गुरुवार दि १सप्टेंबर रोजी काढण्यात आला.
या लकी ड्रॉ मधून पहिल्या क्रमांकासाठी दोन चाकी मोटारसायकल, दुसऱ्या क्रमांकासाठी पाणी सोलर तर तिसऱ्या क्रमांकासाठी पिठाची चक्की अशी तीन मोठी बक्षीस काढण्यात आली आहेत. या लकी ड्रॉ सोडत मधून प्रथम क्रमांकाचे मानकरी म्हणून मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील दिगंबर यशवंत साखरे, दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी रोपळे तालुका पंढरपूर येथील अर्जुन भीमाशंकर जाधव, तर तिसरे बक्षीस देगाव ता पंढरपूर येथील रणजित वामन रणदिवे यांना मिळाले आहे. उर्वरित सात आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यामधे किरण कांबळे, गणेश गायकवाड, रोहित लांडे, बयाजी उबाळे, तानाजी काशीद, महादेव अलदर, जयश्री आवताडे यांचा लकी ड्रॉ मधून समावेश झाला आहे. वरील भाग्यवंताना बक्षीस वाटप करण्यात आले.
या काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ सोडती वेळी दत्तात्रय नागणे, संचालक संजय खरात, मॅनेजर सोमनाथ केसकर, हणमंत पोरे, भूषण ननवरे, बलाजीसिंह परदेशी, प्रथमेश बोंगे, शामसुंदर चव्हाण, अफसर शेख, संतोष बोबडे,ओमप्रसाद दूधाट, यांच्यासह सोनालिका ट्रॅक्टरचे अधिकारी व समृद्धी ट्रॅक्टर्स एजसीचे कर्मचारी तसेच ट्रॅक्टर खरेदी केलेले ग्राहक उपस्थित होते.

चौकट

गणेशोत्सव कालावधीसाठीही बक्षीस योजना

सोनालीका ट्रॅक्टर खरेदीवर कायम लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षीस देण्यात येत असते. सध्या गणेशोस्तव सुरू असून या कालावधीसाठीही ट्रॅक्टर खरेदीवर समृद्धी ट्रॅक्टर एजनसी चा वतीने वरीलप्रमाणे मोठ्या किमतीची बक्षिसे देण्यात येणार आहेत, त्यामुळे या बक्षीस योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here