पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्यात अग्रगण्य शोरुम समृध्दी ट्रॅक्टर्सच्या वतीने ७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान आयोजित ‘सोनालीका ट्रॅक्टर खरेदी करा आणि सोने जिंकण्याची संधी मिळवा’ लकी ड्रॉतील विजेत्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ ग्रॅम सोन्याचे वाटप करण्यात आले आहे. यातील विजेते शेतकऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत, कृष्णा परमेश्वर डांगे, कौशल्या बबन रोकडे, संदीप संजीव सुरवसे, धनाजी गोरख शेंबडे, शरद भिकू वाघमारे, नौशाद इब्राहिम मुजावर, दत्तात्रय शंकर खडतरे.
‘सोनालीका ट्रॅक्टर खरेदी करा आणि सोने जिंकण्याची संधी मिळवा’ ही लकी ड्रॉ योजना समृध्दी ट्रॅक्टर्सकडून विविध सण उत्सवांच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत असते. दिवाळी काळात ७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान हा लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता.
या लकी ड्रॉ मध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते. यातून विजेते शेतकरी आता सोन्याचे मानकरी ठरले आहेत. फेब्रुवारी महिन्यात देखील १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान शिवजयंती निमित्त या लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. या लकी ड्रॉ मध्ये ५ ग्रॅम, ३ ग्रॅम आणि २ ग्रॅम या प्रमाणे विजेत्यांना सोन्याचे नाणे भेट म्हणून देण्यात येणार आहेत अशी माहीती मॅनेजर श्री.केसकर यांनी दिली..